नसीरुद्दीन शाह ‘सरफरोश’ सिनेमातील ‘गुलफाम हसन’ची भूमिकाप्रत्यक्षात उतरवत आहेत का?

Date:

मुंबई, दि. २९ ऑक्टोबर २०२६ : भारतीय जनता पार्टी, मुंबईच्या वतीने ‘लोकतंत्र बचाओ – अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत आज दि. २९ ऑक्टोबर २०२६ रोजी भाजपा मुंबई कार्यालय, वसंत स्मृती, दादर पूर्व येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेत भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी अभियानाची भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला तसेच आगामी जनजागृती कार्यक्रमांची माहिती दिली.

आमदार अमीत साटम म्हणाले की, गेल्या बारा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा मान-सन्मान आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठा वाढली आहे. भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून, देशात अनेक महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. कोविडच्या जागतिक संकटाच्या काळात केंद्र सरकारने जाहीर केलेले आत्मनिर्भर भारत पॅकेज आणि देशात राबविण्यात आलेल्या लसीकरण कार्यक्रमामुळे भारताला संकटातून बाहेर पडण्यास मदत झाली, असे त्यांनी नमूद केले.

विरोधकांच्या राजकारणावर टीका करताना साटम म्हणाले की, काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडून दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचा भाजपाचा आरोप आहे. विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी विरोधकांकडून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची भूमिका त्यांनी मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाचा सन्मान राखणे आणि लोकशाही प्रक्रियेवर विश्वास ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या कथित वक्तव्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी “भारत तेरे तुकडे होंगे, इंशा अल्लाह, इंशा अल्लाह” आणि “अफझल हम शर्मिंदा हैं, तेरे कातिल जिंदा हैं” या घोषणांचा उल्लेख केला. या घोषणा नेमक्या कोणत्या विचारांचे प्रतिनिधित्व करतात आणि या घोषणांना नसीरुद्दीन शाह यांचे समर्थन आहे का, याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन आमदार अमीत साटम यांनी केले. या घोषणांबाबत नसीरुद्दीन शाह यांनी स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
भारताची वाढती जागतिक प्रतिष्ठा काही आंतरराष्ट्रीय शक्तींना मान्य नसल्याचा आरोप करत, देशांतर्गत विरोधक आणि काही भारतविरोधी शक्तींकडून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा साटम यांनी केला. तसेच, जावेद अख्तर, शबाना आझमी आणि नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिकांवर त्यांनी टीका केली. या संदर्भात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबाबतही त्यांनी टिप्पणी केली.

भारताची वाढती जागतिक प्रतिष्ठा काही आंतरराष्ट्रीय शक्तींना मान्य नसल्याचा आरोप करत, देशांतर्गत विरोधक आणि भारतविरोधी शक्ती एकत्रितपणे देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा साटम यांनी केला. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दिशाभूल करणाऱ्या माहितीला बळी न पडता वस्तुस्थिती समजून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

२ नोव्हेंबर रोजी शिवतीर्थ ते कामगार मैदान पदयात्रा

‘लोकतंत्र बचाओ – अराजकता हटाओ’ अभियानांतर्गत सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता शिवतीर्थ, शिवाजी पार्क येथून कामगार मैदानापर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पदयात्रेच्या माध्यमातून लोकशाही आणि संविधानाप्रती आपली बांधिलकी व्यक्त करण्यात येणार असल्याचे आमदार अमीत साटम यांनी सांगितले. ही पदयात्रा शांततापूर्ण पद्धतीने आयोजित करण्यात येणार असून, संविधानाचा सन्मान, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि समाजात जनजागृती हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पदयात्रेच्या समारोपानंतर उपस्थित प्रमुख नेत्यांपैकी एका नेत्याचे भाषण होणार आहे.

या अभियानांतर्गत मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये जिल्हास्तरावर व विधानसभा स्तरावर प्रबुद्ध नागरिक संमेलने, तसेच विविध क्षेत्रांतील प्रभावशाली व्यक्तींसोबत संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे निर्माण होणारे गैरसमज दूर करणे, लोकशाही प्रक्रियेबाबत जागरूकता वाढवणे आणि नागरिकांपर्यंत वस्तुस्थिती पोहोचवणे हा या कार्यक्रमांचा उद्देश असल्याचे साटम यांनी स्पष्ट केले.

‘विकसित भारत २०४७’ हे ध्येय साध्य करण्यासाठी समाजात शांतता, एकता आणि लोकशाही मूल्ये टिकवून ठेवणे आवश्यक आहे. भाषा, जात, धर्म आणि प्रांताच्या आधारावर समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना विरोध करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा भाजपा मुंबईचा संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला कॅबिनेट मंत्री ॲड.मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, भाजपा मुंबई सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी, श्री. राजेश शिरवडकर, श्रीमती श्वेता परुळकर, मुंबई भाजपा प्रवक्ते ॲड. अनिकेत निकम, ॲड. राहुल तिवारी, श्री. अजय सिंह आणि श्री. किशोर जोशी यांच्यासह अन्य पदाधिकारी व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणार-श्रीनाथ भिमाले

पुणे, ता. २९ : पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी...

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वीजवाहिन्या भूमिगत करणार

पुणे, ता. २९ : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अभय अरण्य सोसायटी...

दिवाळीतील गुरुवारची पाणी कपात रद्द

सणासुदीत पुणेकरांना दिलासा स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती पुणे,...

‘दुष्काळात साहित्य संमेलन कशासाठी? संमेलन रद्द करा, १८ कोटी दुष्काळग्रस्तांना द्या!’ — सुनील माने

शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा...