कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वीजवाहिन्या भूमिगत करणार

Date:

पुणे, ता. २९ : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अभय अरण्य सोसायटी ते शिवशंभो नगर गल्ली क्रमांक एक या परिसरातील महावितरणच्या हवेतून जाणाऱ्या वीजवाहिन्या भूमिगत करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे दोन कोटी ६० लाख रुपये खर्च अपेक्षित असून, नऊ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील संबंधित भागात महावितरणच्या उच्चदाब आणि लघुदाब वीजवाहिन्या सध्या विद्युत खांबांवरून जात आहेत. या वाहिन्या भूमिगत करण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने महावितरणकडून अंदाजपत्रक मागविले होते. त्यानुसार जीएसटीसह दोन कोटी ९५ लाख २१ हजार रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले. तांत्रिक छाननी समितीच्या मान्यतेनंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

या कामासाठी आठ निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी सात निविदाधारक पात्र ठरले, तर एक निविदा अपात्र ठरली. शेवाळे इलेक्ट्रिकल्स यांची जीएसटीपूर्व दोन कोटी २० लाख १३ हजार रुपयांची निविदा स्वीकारण्याची शिफारस विद्युत विभागाने केली आहे. त्यावर १८ टक्के जीएसटीसह एकूण दोन कोटी ५९ लाख ७५ हजार ८४३ रुपये खर्च अपेक्षित आहे.

या कामांतर्गत २२ केव्ही उच्चदाबाच्या भूमिगत केबल टाकणे, केबलसाठी खोदाई करणे, आरएमयू यंत्रणा आणि फीडर पिलर बसविणे, लघुदाब केबल टाकणे, संरक्षक पाइप, अर्थिंग तसेच विद्यमान विद्युत खांब आणि संबंधित साहित्य काढणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

दरम्यान, शेवाळे इलेक्ट्रिकल्स यांनी सादर केलेले दर बाजारभावाशी सुसंगत नसल्याची नोंद निविदा कागदपत्रांत करण्यात आली आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून कामगिरी हमीपोटी बँक गॅरंटी घेण्यात आली आहे. मंजूर तांत्रिक निकषांनुसार काम करून घेण्याची जबाबदारी विद्युत विभागावर राहणार आहे.

या कामासाठी संबंधित अर्थशीर्षावर ८५ कोटी रुपयांची तरतूद असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. उपलब्ध निधीनुसार काम करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार उर्वरित निधीची व्यवस्था संबंधित विभागाला करावी लागणार आहे.

अशी होणार कामे

  • २२ केव्ही उच्चदाबाच्या वीजवाहिन्या भूमिगत करणार.
  • लघुदाब वीजवाहिन्यांसाठी भूमिगत केबल टाकणार.
  • केबलसाठी खोदाई आणि संरक्षक पाइप बसविणार.
  • आरएमयू यंत्रणा आणि फीडर पिलर उभारणार.
  • विद्युत सुरक्षेसाठी अर्थिंगची व्यवस्था करणार.
  • विद्यमान विद्युत खांब आणि संबंधित साहित्य काढणार.
  • काम पूर्ण करण्यासाठी नऊ महिन्यांची मुदत.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणार-श्रीनाथ भिमाले

पुणे, ता. २९ : पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी...

दिवाळीतील गुरुवारची पाणी कपात रद्द

सणासुदीत पुणेकरांना दिलासा स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती पुणे,...

‘दुष्काळात साहित्य संमेलन कशासाठी? संमेलन रद्द करा, १८ कोटी दुष्काळग्रस्तांना द्या!’ — सुनील माने

शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा...