संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेसाठी जन्मतारखेच्या दाखल्याची गरज नाही-आमदार सिद्धार्थ शिरोळे

Date:

राज्य शासनाचा निर्णय

पुणे : राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजना याकरीता जन्म तारखेच्या दाखल्याची आता गरज नाही, असा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (गुरुवारी) प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

ग्रामीण भागातील तसेच शहरातही काही भागातील बाळांचे जन्म दवाखान्याऐवजी घरीच होतात. त्यामुळे त्यांच्या जन्मतारखेचा दाखला मिळू शकत नाही. या कारणाने अनेकांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना यांचे लाभ घेता येत नाहीत, ही वस्तुस्थिती आमदार शिरोळे यांनी विधीमंडळ अधिवेशनात मांडली होती आणि त्यासाठी पाठपुरावाही केला, त्याला यश आले. आता यापुढें आधारकार्डवरील जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल, असा निर्णय घेतला असून राज्य सरकारने तसा जीआर काढला आहे, अशी माहिती आमदार शिरोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या दोन्ही योजनांसाठी जन्मतारखेच्या दाखल्याची अट काढून टाकल्याने या योजनेचा लाभ घेणे अनेकांना सोपे होणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत, अशी प्रतिक्रिया आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणार-श्रीनाथ भिमाले

पुणे, ता. २९ : पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी...

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वीजवाहिन्या भूमिगत करणार

पुणे, ता. २९ : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अभय अरण्य सोसायटी...

दिवाळीतील गुरुवारची पाणी कपात रद्द

सणासुदीत पुणेकरांना दिलासा स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती पुणे,...