देशात प्रथमच बॅटरीद्वारे १००० मेगावॅट वीजपुरवठा; महावितरणचे यश

Date:

मुंबई, दि. २९ ऑक्टोबर २०२६: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीच्या सौरऊर्जानिर्मिती योजनेत निर्माण झालेली अतिरिक्त वीज तसेच ग्रीडद्वारे उपलब्ध स्वस्त सौरऊर्जा बॅटरीमध्ये साठवून सायंकाळी मोठ्या वीज मागणीच्या वेळी वापरण्यासाठी महावितरणने १००० मेगावॅट अवरचा टप्पा गाठला आहे. देशात प्रथमच विकेंद्रित स्वरुपात बॅटरीचा वापर करून इतका मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा करण्यात येत असून राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे वाढलेल्या वीजमागणीच्या काळात हा वीजपुरवठा अत्यंत उपयुक्त ठरला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

त्यांनी सांगितले की, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही गेमचेंजर योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत आतापर्यंत सुमारे ७ हजार मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रित सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प सुरू झाले आहेत. या प्रकल्पांमधून निर्माण होणारी वीज कृषीपंपांना देण्यात येते. अतिरिक्त वीज बॅटरीमध्ये साठवून सायंकाळी कमाल वीज मागणीच्या वेळी देण्यासाठी महावितरणने सुरु केलेल्या बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिम (बीईएसएस) योजनेत ५०० मेगावॅट क्षमतेची बॅटरी साठवणूक क्षमता नुकतीच कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यातून दोन तास वीजपुरवठा होणार असल्याने १००० मेगावॅट अवर इतकी बीईएसएस क्षमता उपलब्ध झाली आहे. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सुरू झालेल्या बॅटरी स्टोरेज योजनेतून सर्वच वीजग्राहकांना लाभ होत आहे.

एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी झाला असून त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात उष्णतेच्या झळा अधिक जाणवत आहेत. परिणामी विजेची उच्चांकी मागणी होत आहे. सौरऊर्जेमुळे दिवसा पुरेसा व किफायतशीर दरात वीजपुरवठा होत आहे. सायंकाळी सौरऊर्जेचा पुरवठा बंद झाल्यानंतर वीज पुरवठा करण्यासाठी अधिक दराने वीज विकत घ्यावी लागते. अशा स्थितीत महावितरणच्या पुढाकाराने सुरू झालेल्या १००० मेगावॅट अवर क्षमतेच्या बॅटरी स्टोरेज प्रकल्पामुळे दिलासा मिळू लागला आहे.

महावितरणने एकूण ७५० मेगावॅट क्षमतेचे बॅटरी साठवणूक प्रकल्प उभारण्याची योजना सुरू केली असून त्यातून दोन तासांसाठी प्रत्येकी ७५० मेगावॅट अर्थात एकूण १५०० मेगावॅट अवर वीज उपलब्ध होईल. त्यापैकी १००० मेगावॅट अवरचे काम पूर्ण झाले आहे. ऊर्वरित काम डिसेंबरअखेर पूर्ण होणे अपेक्षित आहे. याखेरीज ४००० मेगावॅट अवर क्षमतेचे प्रकल्प उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पामुळे सायंकाळी उच्चांकी मागणीच्या वेळी हमखास वीज उपलब्ध होणे आणि बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत किफायतशीर दरात उपलब्धता असे दोन लाभ आहेत. आगामी उन्हाळ्यात या योजनेचा सर्वाधिक लाभ होईल.

देशातील पहिली वीज कंपनी
देशातील वीज वितरण कंपन्यांमध्ये १००० मेगावॅट अवर इतक्या क्षमतेचे विकेंद्रित वितरण जाळ्याशी संलग्न असलेले बॅटरी स्टोरेज प्रकल्प सुरू करणारी महावितरण ही पहिली वीज वितरण कंपनी आहे. राज्यात एकूण ५० ठिकाणी प्रत्येकी १० मेगावॅट क्षमतेचे बॅटरी स्टोरेज प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिम हा नवीकरण ऊर्जा (रिन्युएबल एनर्जी) क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्याद्वारे नवीकरणीय ऊर्जेचा वापर करून तयार झालेली वीज साठविणे आणि ती वीज सर्वाधिक मागणीच्या वेळी वापरणे शक्य झाले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणार-श्रीनाथ भिमाले

पुणे, ता. २९ : पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी...

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वीजवाहिन्या भूमिगत करणार

पुणे, ता. २९ : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अभय अरण्य सोसायटी...

दिवाळीतील गुरुवारची पाणी कपात रद्द

सणासुदीत पुणेकरांना दिलासा स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती पुणे,...