पुणे पदवीधरमध्ये हर्षदा देशमुख-जाधव विजयाच्या उंबरठ्यावर! २१ व्या फेरीनंतर ८,८५२ मतांची आघाडी

Date:

विजयाचा कोटा गाठण्यासाठी आणखी १,८१६ मतांची गरज; डॉ. स्मिता जाधव यांच्याशी चुरस कायम

पुणे | माय मराठी वृत्तसेवा

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रथम पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरही कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेला १ लाख १३ हजार ९५ मतांचा कोटा पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे पुढील पसंतीच्या मतांची मोजणी सुरू असून, २१ व्या बाद फेरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी आघाडी कायम ठेवली आहे.

हर्षदा देशमुख-जाधव यांना आतापर्यंत १ लाख ११ हजार २७९ मते मिळाली आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी डॉ. स्मिता योगेश जाधव यांना १ लाख २ हजार ४२७ मते मिळाली आहेत.

त्यामुळे हर्षदा देशमुख-जाधव यांनी ८ हजार ८५२ मतांची आघाडी घेतली आहे. विजयासाठी आवश्यक असलेला कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना आणखी १ हजार ८१६ मतांची गरज आहे.

२१ व्या बाद फेरीनंतरची मतस्थिती

उमेदवारमते
हर्षदा देशमुख-जाधव१,११,२७९
डॉ. स्मिता योगेश जाधव१,०२,४२७
सुनिल जबरचंद मोदी३,०६६
सोमनाथ जनार्धन साळुंखे२,६३८
नामदेवराव जाधव१,९५५
लक्ष्मण साहेबराव हरणावळ१,४७२

विजयाची अधिकृत घोषणा अद्याप बाकी

हर्षदा देशमुख-जाधव या विजयाच्या कोट्याच्या जवळ पोहोचल्या असल्या, तरी पुढील पसंतीच्या मतांची मोजणी अद्याप सुरू आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अधिकृत निकाल जाहीर होईपर्यंत अंतिम विजय निश्चित मानता येणार नाही.

पुढील बाद फेऱ्यांमध्ये मतांचे हस्तांतरण कसे होते, याकडे उमेदवारांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कर्जाच्या हप्त्यासाठी शेतकऱ्याचे अपहरण केल्याचा आरोप; फायनान्स कंपनीच्या कार्यालयात मृतदेह आढळल्याने खळबळ!

नांदेडमधील चंद्रकांत शिंदे मृत्यूप्रकरणी खून व अपहरणाचा गुन्हा; पाच...

पुणे पदवीधरमध्ये हर्षदा देशमुख-जाधव यांची आघाडी कायम; शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर!

पदवीधरच्या २६ व्या बाद फेरीनंतर हर्षदा देशमुख-जाधव ८,८७० मतांनी...

आंध्र प्रदेशला ‘अर्नब’ चक्रीवादळाचा तडाखा! ताशी १३५ किमी वेगाचे वारे; मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

किनारपट्टीवर झाडे उन्मळली, वीजवाहिन्यांचे नुकसान; हजारो नागरिकांचे स्थलांतर, ओडिशासह...

आदित्य ठाकरेंनंतर आता राज ठाकरेही जंगलात शिरले! कर्जतच्या साई डोंगरावरील वृक्षतोडीची प्रत्यक्ष पाहणी सुरू

टोरेंट पॉवरच्या प्रकल्पाविरोधात राजकीय संघर्ष तीव्र; मनसे अध्यक्ष थेट...