मिळकतकर आकारणीसाठी ‘सेल्फ असेसमेंट’ प्रणाली तयार करा; विरोधी पक्षनेते निलेश निकम यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

Date:

पुणे, दि. २६ ऑक्टोबर २०२६ :
पुणे शहरातील मिळकतकर आकारणी अधिक पारदर्शक, सुलभ आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी नागरिकांना स्वतःच ‘सेल्फ असेसमेंट’ करता येईल अशी स्वतंत्र संगणक प्रणाली तयार करावी, अशी मागणी पुणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अॅड. निलेश निकम यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

यासंदर्भात आयुक्तांना दिलेल्या निवेदनात निकम यांनी म्हटले आहे की, पुणे शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नवीन मिळकती निर्माण होत असतात. मात्र त्यांची कर आकारणी करण्यासाठी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. मिळकतकर आकारणीसाठी जोड करून घेतल्यानंतर नागरिकांना विविध माहितीसाठी महापालिकेच्या कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागतात. तसेच वार्षिक करपात्र रक्कम निश्चित करताना पारदर्शकता नसल्याने अनेक तक्रारी समोर येतात.

निकम यांनी निवेदनात नमूद केले आहे की, सन २००७-०८ मध्ये महापालिकेने मुख्य सभेत धोरण ठरवून मिळकतींचे भाडे शासनाच्या रेडी रेकनरच्या आधारे ठरवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गेल्या काही वर्षांत फक्त पैसे वसूल करण्यासाठी नवीन मिळकतींवर पत्रके निश्चित केली जात असल्याची स्थिती आहे. रेडी रेकनरच्या वाढीप्रमाणे मिळकतीचे भाडे वाढणे अपेक्षित असताना ज्या मिळकतींसाठी दर कमी आहेत, त्यांना कमी दरानेच भाडे आकारले जाणे अधिक योग्य ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

यावर तोडगा म्हणून नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून मिळकतकर विभागासाठी स्वतंत्र डिजिटल प्रणाली विकसित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रणालीमध्ये नागरिकांना स्वतःच्या मिळकतीचे चौरस फूट क्षेत्र, बिनकामाचा/बांधकामाचा तपशील, पत्ता, सर्वे नंबर, सीटीएस नंबर तसेच रेडी रेकनरनुसार जागेच्या भागाचा दर भरता येईल आणि त्याआधारे वार्षिक करपात्र रक्कम निश्चित होईल, अशी व्यवस्था करण्याची सूचना त्यांनी केली आहे.

निकम यांच्या मते, अशा प्रणालीमुळे कर आकारणीत पारदर्शकता वाढेल, नागरिकांना अनावश्यक हेलपाटे मारावे लागणार नाहीत आणि मनपा कर्मचाऱ्यांवरील ताणही कमी होईल. त्याचबरोबर, संबंधित मिळकतीची तपासणी केल्यानंतर एखाद्या मिळकतधारकाने चुकीची माहिती दिली असल्यास त्याच्यावर कारवाई करण्याची तरतूदही करता येईल.

मिळकतकर वसुली अधिक परिणामकारक आणि तक्रारमुक्त करण्यासाठी महापालिकेने तातडीने कार्यवाही करून अशी पारदर्शक संगणक प्रणाली विकसित करावी, अशी मागणी अॅड. निलेश निकम यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘द चेम्बर्स आणि सीएस न्यायविधी एडीआर फोरम’ मधून सामान्यांसाठी न्यायव्यवस्था अधिक सुलभ व्हावी :पद्मभूषण ॲड. उज्ज्वल निकम

गरजूंना विनामूल्य मार्गदर्शन व न्यायालयातील कार्यवाही करीता विशेष सहकार्यपुणे...

शेतकऱ्यांना धमकावून कर्जवसुली केली तर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा!

नांदेडमधील शेतकऱ्याच्या मृत्यूची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या...

दीड कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजारांची मदत; दिवाळीपूर्वी खात्यात पैसे जमा करण्याचे निर्देश

मंत्रिमंडळ बैठकीत अग्रीम मदतीला मंजुरी; सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात फौजदारी कारवाईचा...