अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हिंदू समरसता संगमचे आयोजन

Date:

विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने २४ आॅक्टोबर रोजी उद्घाटन; पारंपरिक वाद्य वादनाचा विश्वविक्रम साकारणार

पुणे : विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने अशोक सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हिंदू समरसता संगम या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, २४ आॅक्टोबर रोजी करण्यात आले आहे. स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सायंकाळी पाच वाजता पंच पारंपरिक वाद्य वादनाचा विश्वविक्रम साकारण्याचा विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यात असून सदर विश्व विक्रम श्रद्धेय अशोकजी यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात येणार आहे अशी माहिती प्रांत मंत्री किशोर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेस प्रांत सहमंत्री  नितीन वाटकर, निधी प्रमुख धनाजी शिंदे, मातृशक्ती प्रमुख प्रिया रसाळ, दुर्गावहिनी संयोजिका सोनाली नाथ, विभाग मंत्री संतोष अनगोलकर, दिनेश लाड, कार्यक्रम व्यवस्था सह प्रमुख करण घोडके व श्रीकांत चिल्लाळ उपस्थित होते.  

श्रद्धेय अशोकजी सिंघल उद्घाटन समारोह समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. एस.के. जैन म्हणाले, कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष आलोककुमार प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्री श्री १००८ आचार्य श्री स्वामी जितेंद्रना थमहाराज यांचे पावन सान्निध्य लाभणार असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक  नानासाहेब जाधव हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

किशोर चव्हाण म्हणाले, श्रद्धेय अशोकजी सिंघल यांच्या त्याग, समर्पण आणि राष्ट्रचिंतनाला वंदन करण्याच्या उद्देशाने जन्मशताब्दी वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशोकजी सिंघल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कार्य केले. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हिंदू समाजाच्या संघटनासाठी प्रयत्न केले. हिंदू धर्म, संस्कृती आणि परंपरांच्या जतनासाठी देशभर जनजागृती केली. अयोध्येतील रामजन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व करत राम मंदिराच्या उभारणीसाठी देशव्यापी जनआंदोलन उभे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.  

तसेच संत-महंत आणि विविध हिंदू संघटनांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी प्रयत्न केले. हिंदू समाजातील सामाजिक समरसता आणि एकात्मता वाढवण्यावर भर देत धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या संघटनासाठी आयुष्यभर कार्य केले. अशोकजी गो ,गंगा,गीता आणि गायत्रीचे उपासक होते. वेद आणि संस्कृत भाषेचा प्रचार त्यांनी केला. आगामी काळात विश्व हिंदू परिषदेचे संघटनात्मक कार्य अधिक वाढवून महिला सबलीकरण, हिंदू सुरक्षा, गोरक्षण , धर्मांतर थांबविणे ,समरसता भाव सदृढ करणे  हा सर्व  कार्याला गती देणार आहोत आणि हीच ख-या अर्थाने त्यांना श्रद्धांजली होईल. 

हिंदू समरसता कार्यक्रमास सर्व हिंदू बांधव आणि भगिनी यांनी आवर्जून उपस्थित राहून समसतेच्या आविष्काराचे दर्शन घडवू यात, असे आवाहन प्रांत सहमंत्री नितीन वाटकर यांनी केले.

पंच पारंपरिक वाद्य विश्वविक्रम
पंच पारंपरिक वाद्य विश्व विक्रम कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता होणार आहे. यामध्ये ५०० शंख, ३०० ढोल ताशा, १०० टाळ, १०० पखवाज, ५० संबळ आणि १ बासरी अशा १०५१ वाद्यांचा समावेश आहे. गणेश कला क्रीडा मंचाच्या प्रांगणात हा विक्रम होणार असून याकरिता पद्मश्री शिवमणी यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती बजरंग दल प्रांत संयोजक नितीन महाजन यांनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विजयादशमी निमित्त पराक्रमी सेनाधिकारी सन्मान सोहळा

सैनिक मित्र परिवार, पुणे च्या वतीने आयोजन ; निवृत्त...

नाट्यस्पर्धा हा महावितरणचा सांस्कृतिक ठेवा; आव्हानात्मक सेवेसोबत कर्मचाऱ्यांकडून कलागुणांचे जतन – श्री. राजेंद्र पवार

पुण्यात ‘आंतर प्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा-२०२६’ चे उद्घाटन               पुणे, दि....

जागतिक पॉवरलिफ्टर प्रतिभा लोणे हिला ‘चक्रवर्ती सम्राट अशोक राज्य क्रीडारत्न पुरस्कार’ प्रदान

​पुणे: अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून...