‘निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार आम्हीच’:मंत्री चंद्रकांत पाटलांचा दावा; निवडणुकांसाठी प्रचाराला वेग

Date:

सोलापूर-राज्यातील विधानपरिषदेच्या 5 मतदारसंघांसाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून राजकीय नेत्यांच्या प्रचाराला वेग आला आहे. सर्वांचे लक्ष लागलेल्या पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळत असून, महायुतीने शिक्षक मतदारसंघात एका 30 वर्षीय तरुणाला उमेदवारी दिली आहे, तर शिवसेनेने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिला आहे. एका बाजूला विरोधकांकडून ‘ईव्हीएम हटाव’चा नारा देत निवडणूक आयोगावर सातत्याने टीका केली जात असतानाच, दुसरीकडे भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र या निवडणुकीत आपल्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी सोलापूर दौऱ्यावर आलेले मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. निवडणुका ईव्हीएम मशिनवर घ्या किंवा कागदावर घ्या, जिंकणार तर आम्हीच आहोत. सध्या विरोधकांची अवस्था ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी झाली आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. याचा दाखला देताना ते म्हणाले की, दिल्ली युनिव्हर्सिटीत कागदावर झालेल्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने चारपैकी तीन जागा जिंकल्या आहेत, तसेच ओडिशातील सहाच्या सहा विद्यापीठांच्या निवडणुकाही त्यांनीच जिंकल्या आहेत. त्यामुळे आता 27 तारखेला होणाऱ्या या निवडणुकांमध्येही आपल्याला हेच दाखवून द्यायचे असून, निवडणुका कागदावर जरी घेतल्या तरी विजय आमचाच होईल, असा ठाम दावा पाटील यांनी केला आहे.

नाईलाज को क्या इलाज?

शिवसेना शिंदे गटाने पुण्यात अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दिला आहे. यावर देखील चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, शिवसेनेचा सचिन सानप यांना पाठिंबा ही बॅड न्यूज नक्की आहे, पण अजून २ दिवस आहेत, त्यात काहीतरी सकारात्मक घडेल अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. तसेच सानप यांना दिलेल्या पाठिंब्यानंतर आताची स्थिती ही नाईलाज को क्या इलाज अशीह असल्याने काय होते ते पाहता येईल, अशी टिप्पणी त्यांनी केली. महायुतीमध्ये मित्र पक्षांवर कसलीही टीका करू नका, असे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

सध्या विरोधकांकडून मतदान प्रक्रियेतील कथित घोळ, एसआयआर आणि ईव्हीएम मशिनच्या वापराबाबत संशय व्यक्त करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, निवडणुका कोणत्याही पद्धतीने घेतल्या तरी विजय आमचाच होईल, असा ठाम विश्वास भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! अभिनेता सुरक्षित, हल्लेखोरांचा शोध सुरू

दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून गोळीबार झाल्याचे वृत्त; चालकासह दोघे जखमी...

श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे आयोजित आरोग्य शिबीरात ३५० महिलांची तपासणी

नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ; श्री महालक्ष्मी...

महाराष्ट्रात पुन्हा वादळी पावसाचे सावट! कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात यलो अलर्ट

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची...

पुण्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा! पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; तापमान ३४ अंशांवर

पुणेकर उकाड्याने हैराण; पुढील दोन दिवसही तापमान ३३ ते...