मुंबईतील सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांच्या तपासणीचा अहवाल द्या : डॉ. नीलम गोऱ्हे

Date:

पत्राची दखल घेत महापालिका आयुक्तांकडून ई-मेल संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला

मुंबई, दि. १६ ऑक्टोबर : मुंबईतील सोनोग्राफी व वैद्यकीय गर्भपात केंद्रांच्या नियमित तपासणीचे प्रमाण कमी असल्याच्या वृत्ताची पडताळणी करून सात दिवसांत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा. प्रलंबित तपासण्या पूर्ण करण्यासाठी ३० दिवसांची विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती आणि PCPNDT व MTP कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय कृती दलाच्या अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. त्यांच्या पत्राची दखल घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी प्राप्त ई-मेल संबंधित विभागाकडे पाठविला आहे.

मुंबईतील नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्रे व मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रांची संख्या, मागील दोन तिमाहींतील तपासण्या आणि उल्लंघनांवरील कार्यवाहीचा तपशील महापालिकेने सादर करावा. तपासणीचे प्रमाण कमी राहण्याची कारणे पडताळून संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे.

सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी, यंत्रांचा तपशील, डॉक्टरांची पात्रता, फॉर्म ‘एफ’ आणि आवश्यक नोंदी तपासाव्यात. गर्भपात केंद्रांची मान्यता, डॉक्टरांची पात्रता व आवश्यक संमतीची स्वतंत्र तपासणी करावी. पूर्वी नोटीस दिलेल्या केंद्रांची पुनर्तपासणी करून उल्लंघन आढळल्यास सक्षम प्राधिकाऱ्याने कायदेशीर कार्यवाही करावी, असे त्यांनी सुचविले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने सर्व जिल्हे व महानगरपालिकांचा तुलनात्मक अहवाल आणि कालबद्ध कृती आराखडा १५ दिवसांत सादर करावा. कृती दलाच्या विशेष बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेऊन दर आठवड्याला कार्यवाहीचा पाठपुरावा करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

तपासणीदरम्यान महिलांची ओळख व वैद्यकीय माहिती गोपनीय ठेवावी. कायदेशीर गर्भपात सेवा आणि आवश्यक सोनोग्राफी सेवा विनाकारण बाधित होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असेही डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एकवीरा देवी मंदिराच्या पायथ्याशी निवारा शेडसाठी आमदार निधीतून १२ लाख रुपयांची शिफारस : डॉ. नीलम गोऱ्हे

एकवीरा मातेच्या चरणी प्रार्थना; राज्यातील दुष्काळाचे संकट दूर होऊन...

IDBI बँकेतील ६०.७२% हिस्सा विदेशी कंपनीला विकणे बेकायदेशीर व देशासाठी धोकादायक: विश्वास उटगी.

IDBI बँकेतील LIC आणि भारत सरकारचे भागभांडवल परदेशी गुंतवणूकदाराला...

स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीची ताकद

महायुतीच्या समन्वय बैठकीत निर्धार; पाचही जिल्ह्यांत एकत्रित प्रचारावर भर पुणे,...