१३६ इन्फंट्री बटालियन (टीए) इको महारमध्ये भूतपूर्व सैनिक व महिला वन कर्मचाऱ्यांसाठी भरती

Date:

पुणे, दि. १६- : १३६ इन्फंट्री बटालियन (टीए) इको महारमध्ये सशस्त्र दलातील भूतपूर्व सैनिक तसेच केंद्रीय व राज्य वन विभागातील पात्र भूतपूर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भरती प्रक्रिया १८ ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भगत पॅव्हेलियन, बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, खडकी, पुणे येथे, तर २४ ते २७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सैनिक स्कूल, सातारा येथे सकाळी ५ वाजल्यापासून होणार आहे.

या भरतीमध्ये सैनिक (जनरल ड्युटी) पदाच्या १२९ जागा आणि ट्रेडसमनच्या १० जागा उपलब्ध आहेत. ट्रेडसमनमध्ये सैनिक क्लार्क (जनरल ड्युटी) ७, हाऊसकीपर १, शेफ कम्युनिटी १ आणि धोबी १ अशा पदांचा समावेश आहे. या पदांसाठी संपूर्ण भारतातील पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

पात्रता व अटी : उमेदवार सशस्त्र दलातील निवृत्तिवेतनधारक भूतपूर्व सैनिक किंवा वने व हवामान बदल मंत्रालय (MoEF&CC) तसेच राज्य वन विभागात किमान २० वर्षे सेवा केलेले भूतपूर्व महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे. संबंधित उमेदवारांची सेवानिवृत्ती किंवा सेवामुक्तीच्या तारखेपासून भरतीच्या तारखेपर्यंत पाच वर्षांच्या आत नोंदणी होणे आवश्यक आहे. वैद्यकीय श्रेणी शेप-१ असणे, चारित्र्य अनुकरणीय किंवा अतिशय चांगले असणे आणि कोणत्याही दिवाणी अथवा फौजदारी प्रकरणात सहभाग नसणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल.

आवश्यक कागदपत्रे : मूळ निवृत्तिवेतन आदेश (पीपीओ), मूळ डिस्चार्ज बुक व त्याची स्वयं-साक्षांकित प्रत, अधिवास प्रमाणपत्र, भूतपूर्व सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड व त्याची स्वयं-साक्षांकित प्रत, अलीकडील रंगीत पासपोर्ट आकाराची १० छायाचित्रे आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत आणावीत.

भरती मेळाव्याच्या ठिकाणी मोबाईल फोनला परवानगी नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९१६८१६८१३६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
00000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईतील सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांच्या तपासणीचा अहवाल द्या : डॉ. नीलम गोऱ्हे

पत्राची दखल घेत महापालिका आयुक्तांकडून ई-मेल संबंधित विभागाकडे पाठविण्यात...

एकवीरा देवी मंदिराच्या पायथ्याशी निवारा शेडसाठी आमदार निधीतून १२ लाख रुपयांची शिफारस : डॉ. नीलम गोऱ्हे

एकवीरा मातेच्या चरणी प्रार्थना; राज्यातील दुष्काळाचे संकट दूर होऊन...

IDBI बँकेतील ६०.७२% हिस्सा विदेशी कंपनीला विकणे बेकायदेशीर व देशासाठी धोकादायक: विश्वास उटगी.

IDBI बँकेतील LIC आणि भारत सरकारचे भागभांडवल परदेशी गुंतवणूकदाराला...