विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले

Date:

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेबाबत प्रशिक्षण संपन्न

पुणे दि.१६: विधान परिषदेसाठी होणाऱ्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी. मतपत्रिकांवरील पसंतीक्रमानुसार मतमोजणीची प्रक्रिया असल्याने प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले.

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अल्पबचत भवन सभागृहात मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणास सह आयुक्त संजय पलांडे, अपर जिल्हाधिकारी तथा महाऊर्जाचे अतिरिक्त महासंचालक अरुण आनंदकर यांच्यासह विभागातील अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मतमोजणीची प्रक्रिया वेळबद्ध असली, तरी घाई करून चुका करण्यापेक्षा प्रत्येक टप्पा नियमानुसार पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे संपूर्ण पथकाचे श्रम आणि वेळ वाया जाऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने आणि जबाबदारीच्या जाणीवेतून काम करावे. मतमोजणी प्रक्रियेत टेबलवरील पर्यवेक्षक, सहाय्यक, संबंधित अधिकारी आणि माहिती संकलन करणाऱ्या पथकांमध्ये समन्वय असणे आवश्यक असल्याचे श्रीमती तेली-उगले यांनी सांगितले.

विधान परिषद निवडणुकीत मतपत्रिकांद्वारे पसंतीक्रमानुसार मतदान होत असल्याने मतमोजणीची प्रक्रिया ईव्हीएमवरील मतमोजणीपेक्षा वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने प्रक्रियेतील बारकावे समजून घेऊन आपल्यावर सोपविलेली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी. मतमोजणीच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक पडताळणी करावी, नोंदी व्यवस्थित ठेवाव्यात आणि संबंधित मतमोजणी प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या घेण्याची दक्षता घ्यावी, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणादरम्यान आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे. मतमोजणीच्या दिवशी कोणतीही संदिग्धता राहू नये, यासाठी आवश्यक नियम, सूचना आणि कार्यपद्धतींचा अभ्यास करावा. निवडणूक कामकाजातील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचेही विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले. शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांनी पुढील प्रशिक्षणात प्रत्यक्ष प्रक्रियेचा सराव करून मतमोजणीसाठी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सह आयुक्त पलांडे यांनी प्रशिक्षणादरम्यान मतमोजणी प्रक्रियेचे विविध टप्पे, कामानुसार जबाबदाऱ्यांची विभागणी, नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची कर्तव्ये, वैध व अवैध मतपत्रिकांबाबतच्या तरतुदी, मतमोजणीच्या वेळी घ्यावयाची दक्षता तसेच निवडणूक आयोगाचे नियम व कार्यपद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी श्री. आनंदकर म्हणाले, शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी येत्या २६ ऑक्टोबर रोजी बालेवाडी येथे प्रत्यक्ष प्रशिक्षण होणार आहे. यामध्ये मतपेट्या उघडणे, ५० मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करणे आणि मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया यांचे प्रात्यक्षिक देण्यात येणार आहे. मतमोजणी निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मतमोजणी प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यांबाबत त्यांनी माहिती दिली.

मतमोजणीची प्रक्रिया निर्धारित नियमांनुसार आणि काटेकोरपणे पार पाडण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणात विविध बाबी स्पष्ट करण्यात आल्या. मत मोजणी प्रक्रियेत सहभागी अधिकारी तसेच कर्मचारी यांनी विचारलेल्या प्रश्नांची देखील श्री पलांडे व श्री. आनंदकर यांनी उत्तरे दिली.

यावेळी निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईतील सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांच्या तपासणीचा अहवाल द्या : डॉ. नीलम गोऱ्हे

पत्राची दखल घेत महापालिका आयुक्तांकडून ई-मेल संबंधित विभागाकडे पाठविण्यात...

एकवीरा देवी मंदिराच्या पायथ्याशी निवारा शेडसाठी आमदार निधीतून १२ लाख रुपयांची शिफारस : डॉ. नीलम गोऱ्हे

एकवीरा मातेच्या चरणी प्रार्थना; राज्यातील दुष्काळाचे संकट दूर होऊन...

IDBI बँकेतील ६०.७२% हिस्सा विदेशी कंपनीला विकणे बेकायदेशीर व देशासाठी धोकादायक: विश्वास उटगी.

IDBI बँकेतील LIC आणि भारत सरकारचे भागभांडवल परदेशी गुंतवणूकदाराला...