पुणे महानगरातील एचसीएमटीआर व इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला गती

Date:

▪️ संयुक्त मोजणी ३० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

पुणे, दि. १५ : पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या २४ मीटर रुंदीच्या एचसीएमटीआर आणि ६५ मीटर रुंदीच्या इनर रिंग रोड प्रकल्पांच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या मार्गातील आवश्यक जमिनींची संयुक्त मोजणी ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित संयुक्त आढावा बैठकीत या प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी, अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) मनोज पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका, पीएमआरडीए आणि पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दोन्ही प्रकल्पांच्या मार्गातील जमिनींचे सीमांकन आणि संयुक्त मोजणी विहित मुदतीत पूर्ण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. राज्य शासनाच्या अखत्यारीतील आवश्यक जागांच्या हस्तांतरणासाठी शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी आवश्यक असलेली पूरक कागदपत्रे आणि तांत्रिक अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचनाही महानगरपालिकेला देण्यात आल्या.

पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोड हे प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या प्रकल्पांमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) मनोज पाटील यांनी सादरीकरणाद्वारे स्पष्ट केले.

पुणे ग्रँड टूरच्या पार्श्वभूमीवरही आढावा
आगामी ‘पुणे ग्रँड टूर २०२७’च्या पार्श्वभूमीवर शहरातील पायाभूत सुविधा, रस्त्यांचे जाळे आणि वाहतूक व्यवस्थेच्या पूर्वतयारीचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. केंद्र शासनाच्या संरक्षण आणि रेल्वे विभागाच्या अखत्यारीतील जागांसंदर्भातील प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

राज्य शासनाच्या अखत्यारीतील जागांचे हस्तांतरण तसेच खासगी जमिनींच्या भूसंपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीए यांनी परस्पर समन्वयाने कार्यवाही करावी, यावर बैठकीत भर देण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता ! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह कोकणात विजांच्या कडकडाटाचा इशारा

१६ ऑक्टोबरला हवामान बदलणार; देशातील अनेक राज्यांत पावसाचा अंदाज,...

महिलांच्या योगदानाची जाणीव हाच त्यांच्या सन्मानाचा पाया – राजेंद्र पवार

महावितरणच्या ‘सन्मान सौदामिनींचा’ सोहळ्यात नवदुर्गांचा गौरव पुणे, दि. १५ ऑक्टोबर...

महावितरणची भरारी! २० व्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये तब्बल ७ पुरस्कारांनी सन्मान

मुंबई, दि. १५ ऑक्टोबर २०२६: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, हरित...

आरोग्य केंद्रात औषधांचा साठा पत्र्याच्या खोलीत ! महापौरांच्या अचानक पाहणीत अमराळे दवाखान्यातील गैरव्यवस्थापन उघड

शिवाजीनगरच्या ‘आयुष्मान आरोग्य मंदिरा’ला महापौर मंजुषा नागपुरेंची अचानक भेट;...