कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदला- अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे आदेश

Date:

महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

मुंबई, दि. १३ ऑक्टोबर २०२६: दुष्काळी परिस्थितीत राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात १ हजार नवीन वितरण रोहित्र व ‘स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर’ तसेच ‘कॅपॅसिटर बॅँक’ खरेदीसाठी जिल्हानिहाय २० कोटींच्या निधीस मंजुरी दिली आहे. या सर्व कामांची युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्यासाठी मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी सोमवारी (दि. १२) सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला आणि ही सर्व कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करण्याचे आदेश दिले.

मुंबई येथील ‘प्रकाशगड’ मुख्यालयात आयोजित बैठकीमध्ये अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी प्रत्येक जिल्ह्यातील सर्व प्रस्तावित कामांची अंदाजपत्रके बुधवार (दि. १४) पर्यंत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश दिले. या निधीमधून होणाऱ्या वीजयंत्रणेच्या सक्षमीकरणाच्या कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही तसेच नादुरुस्त किंवा बंद पडलेले रोहित्र तातडीने बदलण्यात यावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संचालक श्री. धनंजय औंढेकर (संचालन), श्री. अनुदीप दिघे (वित्त), श्री. योगेश गडकरी (वाणिज्य), श्री. सचिन तालेवार (प्रकल्प), श्री. राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांच्यासह कार्यकारी संचालक तसेच सर्व क्षेत्रीय मुख्य अभियंते व अधीक्षक अभियंते उपस्थित होते.

मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासनाने कृषिपंपांना आणि कृषी वीजवाहिन्यांवरील घरगुती ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी प्रत्येक जिल्हयासाठी २० कोटींचा विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून आवश्यकतेनुसार विद्यमान ६३ केव्हीएऐवजी १०० केव्हीए क्षमतेचे तसेच अतिरिक्त सिंगल पोल रोहित्र उभारण्यात येणार आहे. यासोबतच कृषी वाहिनीवरील घरगुती ग्राहकांना २४ तास वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी ‘स्पेशल डिझाईन रोहित्रे’ (एसडीटी) बसविण्यात येणार आहेत. तर योग्य दाबाने व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी उपकेंद्रांमध्ये आणि वीजवाहिन्यांवर आवश्यकतेनुसार नवीन कपॅसिटर बँक्स बसविण्यात येणार आहेत.

विशेष निधीमधील सर्व प्रस्तावित कामांची अंदाजपत्रके संबंधित अधीक्षक अभियंत्यांनी दि. १४ ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करावेत. दुष्काळी परिस्थितीत रोहित्र बिघाड व इतर तातडीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी २४ तास सुरु असणारी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्याचे निर्देश यावेळी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी दिले.

राज्य शासनाच्या विशेष निधीमधून केवळ कृषीपंपांचा आणि कृषी वाहिन्यांवरील घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा सक्षम करण्यासाठीच कामे प्रस्तावित करावीत. या निधीचा अन्यत्र वापर करू नये असे संचालक (संचालन) श्री. धनंजय औंढेकर यांनी स्पष्ट केले. चालू रब्बी हंगामातच शेतकऱ्यांना सुरळीत व दर्जेदार वीज मिळेल यासाठी ही कामे निर्धारित गुणवत्ता व तांत्रिक मानकांचे तंतोतंत पालन करून वेळेत पूर्ण करा असे निर्देश त्यांनी दिले. याबाबत मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक क्षेत्रीय कार्यालयांना यापूर्वीच निर्गमित करण्यात आल्याचे संचालक श्री. धनंजय औंढेकर यांनी यावेळी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रात ठोकला तळ!

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचे सूक्ष्म नियोजन;...

पुणे–बंगळुरू महामार्ग दिवसभर ठप्प: राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन

पुणे- महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाका आणि कर्नाटकातील हत्तरकी...

अवैध गर्भलिंग निदान व बोगस डॉक्टरांविरुद्ध धडक मोहीम राबवा : डॉ. नीलम गोऱ्हे

सोलापूरमध्ये पीसीपीएनडीटी (PCPNDT) व एमटीपी (MTP) आढावा बैठक; दलालांची...

अभिनेत्री मधू कांबीकर यांना श्रद्धांजली अर्पण

पुणे – अर्थपूर्ण शब्द आणि प्रसंगानुसार बांधलेली चाल, सुरेल...