सेवा सेतू अभियानात २५७८ ग्राहकांनी घेतला सूर्यघर योजनेचा लाभ

Date:

६०,८०४ वीजपुरवठा तक्रारींचे निराकरण; ११,९९२ वीजबिल तक्रारी निकाली

पुणे, दि. १३ ऑक्टोबर २०२६ : महावितरणच्या सेवा सेतू अभियानांतर्गत पुणे परिमंडलात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या २५७८ वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. तसेच ६०,८०४ वीजपुरवठा तक्रारी आणि ११,९९२ वीजबिल तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून, ग्राहकांच्या नावात बदल करण्याची ४५१२ प्रकरणे पूर्ण करण्यात आली आहेत. वीजपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यासाठी २३४ रोहित्रेही बदलण्यात आली आहेत.

महावितरणचे कार्यकारी संचालक दिनेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या नेतृत्वाखाली अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

सूर्यघर योजनेत २५७८ वीजजोडण्या

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत गणेशखिंड मंडलात ७१४, पुणे ग्रामीण मंडलात १११८ आणि रास्तापेठ मंडलात ७४६ वीजजोडण्या कार्यान्वित झाल्या आहेत. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ३१६ सौर कृषी पंप कार्यान्वित करण्यात आले असून, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार (SMART) योजनेअंतर्गत ११ वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

४४२५ नवीन वीजजोडण्यांची प्रकरणे निकाली

अभियानांतर्गत नवीन वीजजोडण्यांची ४४२५ प्रकरणे आणि ग्राहकांच्या नावात बदल करण्याची ४५१२ प्रकरणे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच वीजपुरवठा खंडित होण्याच्या ६०,८०४ आणि वीजबिलासंदर्भातील ११,९९२ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.

२३४ रोहित्रे बदलली

वीजपुरवठ्याची गुणवत्ता आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी पुणे ग्रामीण मंडलात १८१, गणेशखिंड मंडलात ४४ आणि रास्तापेठ मंडलात ९ अशी एकूण २३४ रोहित्रे बदलण्यात आली आहेत. ग्राहकांना सुलभ सेवा देणे, प्रलंबित कामे मार्गी लावणे आणि सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रात ठोकला तळ!

पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी भाजपचे सूक्ष्म नियोजन;...

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी नादुरुस्त रोहित्रे तातडीने बदला- अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे आदेश

महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर मुंबई, दि. १३ ऑक्टोबर २०२६:...

पुणे–बंगळुरू महामार्ग दिवसभर ठप्प: राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन

पुणे- महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाका आणि कर्नाटकातील हत्तरकी...

अवैध गर्भलिंग निदान व बोगस डॉक्टरांविरुद्ध धडक मोहीम राबवा : डॉ. नीलम गोऱ्हे

सोलापूरमध्ये पीसीपीएनडीटी (PCPNDT) व एमटीपी (MTP) आढावा बैठक; दलालांची...