भाजपाचा ‘पैसा फेक तमाशा देख’चा अहंकार विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरवा: हर्षवर्धन सपकाळ.

Date:

भाजपा सरकारच्या काळात *शिक्षणक्षेत्राचा खेळखंडोबा, विकसीत भारताचे स्वप्न हे दिवास्वप्नच, जाहिरातबाजीने विकास होत नाही: पृथ्वीराज चव्हाण.

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी पुण्यात प्रचार मेळावा संपन्न.

पुणे, दि. १३ ऑक्टोबर २०२६.

भारतीय जनता पक्ष निवडणुकीत पैशांचा वारेमाप वापर करत असून पैसा फेक तमाशा देख चा खेळ सुरु आहे. पशाच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात हा अहंकार वाढीस लागला असून भाजपाचा हा पैशाचा माज विधान परिषदेच्या या निवडणुकीत उतरवा. लोकशाहीत मत विकत घेता नाही हे दाखवून द्या आणि महाविकास आघाडीच्या पाचही उमेदवारांना विजयी करा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर व हर्षदा देशमुख जाधव यांच्या प्रचारासाठी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात प्रचार मेळावा पार पडला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार (ऑनलाईन), माजी मंत्री विश्वजित कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार बापुसाहेब पठारे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, प्रभाकर देशमुख, अंकुश काकडे, पुणे शहर काँग्रेस (पूर्व) अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे शहर पश्चिम अध्यक्ष दिप्ती चवधरी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, देशातील व्यवस्थेवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही, निवडणूक आयोग आहे, त्यावरही विश्वास नाही, एमपीएससीवर तरुणांचा विश्वास राहिलेला नाही, या यंत्रणा फेल ठरल्या आहेत तर आपला देश हुकूमशाहीकडे गेलेला आहे, या परिस्थितीतून पुढचे पाऊल कसे टाकायचे हा खरा प्रश्न आहे. लोकशाही व संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवली जात आहेत, या कठीण परिस्थितीत चांगले व हुशार लोकप्रतिनिधी सभागृहात गेले पाहिजेत. पदवीधर व शिक्षकांचे प्रश्न आहेत, त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी या प्रतिनिधींना सभागृहात पाठवले पाहिजेत. काँग्रेस सरकार असतानाही आरएसएसच्या लोकांची कामे केली जात असे, संघाच्या अनेक शैक्षणिक संस्थांना काँग्रेस सरकारने परवानग्या दिलेल्या आहेत. महाविकास आघाडीच्या २०२४ च्या घोषणापत्रात जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते, मविआची सत्ता आली नसली तरीही आम्ही त्या भूमिकेवर आजही ठाम आहोत, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले की, देशातील वातावरण सध्या बदलले आहे, केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारमध्ये भ्रष्टाचार प्रचंड बोकाळला आहे. राज्यात मोठा दुष्काळ पडलेला असून भाजपा सरकार दुष्काळी परिस्थिती व्यवस्थित हाताळताना दिसत नाही. २०१२-१३ मध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार असताना आम्ही दुष्काळ व्यवस्थित हाताळला व शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली होती. आज शिक्षण क्षेत्राचा खेळखंडोबा झाला आहे. भाजपा सरकार विकसीत भारताचे स्वप्न दाखवत आहे पण सध्या (AI) एआयचा जमाना आहे, सरकारने कितीही जाहिरातबाजी केली तरी ते दिवास्वप्नच आहे. आपण बौद्धिक कौशल्यावरच प्रगती करू शकू आणि त्यासाठी शिक्षण संस्था सुदृढ झाल्या पाहिजेत. भाजपा सरकार विरोधात देशातील युवा पिढी व जनता रस्त्यावर आली आहे. भाजपा सरकारचे खरे स्वरुप समोर आलेले आहे पण भ्रमात राहू नका, शेवटपर्यत काम करा, मतदारांना मतदानासाठी बाहेर काढा. जिद्दीने काम केले तर मविआचे दोन्ही उमेदवार निवडून येतील असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिका मुख्य इमारतीत ‘बॉम्बस्फोट-अग्नितांडव’ मॉक ड्रिल; 15 मिनिटांत आग नियंत्रणात, अडकलेल्यांची सुटका

पुणे : जागतिक आपत्ती जोखीम न्यूनीकरण दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या...

पुढील २५ वर्षात आरोग्यदायी अन्नाचे सर्वात मोठे आव्हान

पद्मश्री पोपटराव पवार ; श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे...

बावधन RMC मुक्त ! किरण दगडे पाटलांच्या RMC विरोधातील लढ्याला मोठे यश; पाच प्लांट्सवर कारवाई !

पुणे- बावधन बुद्रुकमधील RMC प्लांट्सविरोधात नगर सेवक किरण दगडे...

मतासोबत आंदोलन स्थळांचीही चोरी करणारे सरकार – आंदोलन सुरू राहील, CECला शिक्षा मिळेल- राहुल गांधी

नवी दिल्ली : दिल्लीतील आपल्या निवासस्थानी INDIA आघाडीचे नेते,...