सस्पेन्सचा थरार घेऊन येतोय ‘केस नं. ९९

Date:

मुंबई, : मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे अजय पुरकर आता दिग्दर्शनाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. अजय पुरकर आणि सई अजय पुरकर दिग्दर्शित ‘केस नं. ९९’ या आगामी मराठी सस्पेन्स-थ्रिलरचा ट्रेलर आणि पोस्टर आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात नवी वाटचाल सुरू करत अजय पुरकर यांनी एका रहस्यमय आणि उत्कंठावर्धक कथेला पडद्यावर मांडले आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर १६ ऑक्टोबर २०२६ रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर होणार आहे.

अजय पुरकर, चिन्मय मांडलेकर आणि मृण्मयी देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा एका अनपेक्षित घटनेपासून सुरू होते. एका मृत्यूभोवती निर्माण होणारे प्रश्न, त्यामागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न आणि तपास जसजसा पुढे जातो तसतशी गुंतत जाणारी परिस्थिती यामुळे ‘केस नं. ९९’मध्ये प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच उत्सुकता कायम ठेवणारा थरार अनुभवायला मिळणार आहे.

ट्रेलरमधून या प्रकरणाची फक्त एक झलक प्रेक्षकांसमोर आली आहे; मात्र तपास अधिकाऱ्याच्या नजरेतून पुढे जाणाऱ्या या कथेत संशयाचे जाळे आणि बुद्धीचे डावपेच यांची लढाई पहायला मिळते. या प्रकरणात नेमकं सत्य काय, कोणावर विश्वास ठेवायचा आणि या घटनांमागचं गूढ काय, याची उत्तरं चित्रपट पाहिल्यावरच मिळतील.

ट्रेलर आणि पोस्टरच्या प्रदर्शनानंतर आता ‘केस नं. ९९’च्या रहस्यामागे नेमकं काय दडलं आहे, याची उत्सुकता वाढली असेलच. मात्र या प्रकरणाचा खरा उलगडा आणि कथेला मिळणारं अनपेक्षित वळण जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना १६ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

‘केस नं. ९९’चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर १६ ऑक्टोबर २०२६ रोजी केवळ अल्ट्रा झकासवर पाहता येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रॅपिडो (Rapido) ‘बाईक टॅक्सी’वर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करा, अन्यथा ८ दिवसांत तीव्र आंदोलन! डॉ बाबा कांबळे यांचा इशारा..

"न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रॅपिडो कंपनीवर कारवाईसाठी महाराष्ट्र रिक्षा...