इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत १९ ऑक्टोबरपर्यंत वाढविली

Date:

पुणे, दि. १२ : भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या सहकार्याने आयोजित इंडिया स्किल्स स्पर्धा २०२६-२७ साठी ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत १९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

देशातील कुशल युवकांना राष्ट्रीय स्तरावर कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी या स्पर्धेतून मिळणार असून, उत्कृष्ट उमेदवारांना पुढे WorldSkills सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकते. जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

काही विशिष्ट कौशल्य क्षेत्रांसाठी उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००३ रोजी किंवा त्यानंतर, तर इतर ५० कौशल्य क्षेत्रांसाठी १ जानेवारी २००६ रोजी किंवा त्यानंतर झालेला असणे आवश्यक आहे. शासकीय व खासगी आयटीआय, सुक्ष्म, लघु व मध्यम, तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालये, कौशल्य प्रशिक्षण संस्था, विद्यापीठे तसेच इतर शैक्षणिक संस्थांमधील पात्र उमेदवारांना सहभागी होता येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी १९ ऑक्टोबर २०२६ पूर्वी Skill India Digital पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी. अधिकाधिक पात्र युवकांनी या संधीचा लाभ घेऊन स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सु. रा. वराडे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे येथे संपर्क साधावा.
0000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य

अजितदादांचे सहकार क्षेत्रातील कार्य पुढे नेणार; सुनेत्रावहिनी पवार यांची...

मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

विशेष सघन पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर; अंतिम मतदार यादी...

33 वर्षांनंतर जंतर-मंतरवर आता आंदोलनांना बंदी ; दिल्लीतील निदर्शनांसाठी अन्य तीन ठिकाणे निश्चित

नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : देशाच्या राजधानीतील आंदोलनांचे सर्वाधिक...

प्रवासी वाहतुकीतून मालवाहतूक करणाऱ्या १८ वाहनांवर कारवाई; २ लाख १५ हजारांचा दंड

पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाची विशेष तपासणी मोहीम पुणे, दि. १२...