माजी आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे यांचे अपूर्ण कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली – डॉ. नीलम गोऱ्हे

Date:

माजी आमदार स्व.सुरेशभाऊ गोरे यांच्या स्मारकासाठी आणि स्थानिक विकासासाठी आमदार निधीतून २५ लाख रुपये देण्याची घोषणा

चाकण, दि. १० ऑक्टोबर २०२६ : खेड तालुक्याचे माजी आमदार स्व. सुरेशभाऊ गोरे यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, स्व. सुरेशभाऊ गोरे यांनी शिक्षण, आरोग्य, स्थानिक विकास आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम केले. चाकण परिसरातील पोलीस यंत्रणेला अधिक मनुष्यबळ आणि वाहने मिळावीत, यांसारखे महत्त्वाचे प्रश्न आम्ही सभागृहात मांडले होते. जनतेच्या हितासाठी काम करण्याची त्यांची तळमळ आणि विकासासाठीचे योगदान कायम स्मरणात राहील.
शिवसेना मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे व शिवसैनिक कायम चाकण , राजगुरूनगर परिसर व गोरे परिवार यांच्या पाठीशी राहिल अशी ग्वाही नीलमताई गोर्हेंनी दिली ,
राजगुरुनगर आणि खेड परिसरात राजकीय मतभेद असले, तरी मनभेद नाहीत, हे आजच्या कार्यक्रमात विविध पक्षांचे पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने स्पष्ट होते. स्व. सुरेशभाऊ गोरे यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे यासाठी स्व स्व.सुरेशभाऊ गोरे यांच्या स्मारकासाठी आणि महिला बचत गट भवन उभारणे आवश्यक आहे, या स्थानिक विकासासाठी आमदार निधीतून २५ लाख रुपये देण्याची घोषणा डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी यावेळी केली.

यावेळी अभिवादन करताना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार बाबाजीशेठ काळे, नगराध्यक्ष मनिषा सुरेश गोरे , निर्मलाताई पानसरे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद, अतुल भाऊ देशमुख सभापती पंचायत समिती , अशोकदादा राक्षे सभापती बाजार समिती, रणजीत भाडे उपसभापती, अंकुश राक्षे, विजया शिंदे, जिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, आनंद गोयल पुणे शहर संघटक व अनेक पदाधिकारी व मान्यवर यावेळी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी सर्वांनी दक्ष राहून पार पाडावी – तुषार ठोंबरे

पुणे, दि.१०: महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघ...

जिरेगाव येथे जागतिक अंडी दिन साजरा.

पुणे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिरेगाव येथे जागतिक...

आरोग्य जनजागृती व समुपदेशन शिबिर

सेवा संकल्प अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना आरोग्य, ईएसआयसी सुविधा व व्यसनमुक्तीबाबत...