जिरेगाव येथे जागतिक अंडी दिन साजरा.

Date:

पुणे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिरेगाव येथे जागतिक अंडी दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी पोषणविषयक जनजागृती उपक्रम घेण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनय कुमार पानसरे यांनी अंड्यांमधील प्रथिने, जीवनसत्त्वे, त्यांचे आरोग्यविषयक फायदे आणि संतुलित आहाराचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच अंड्यांविषयीचे गैरसमज दूर करून कुक्कुटपालन व्यवसायाची माहिती देण्यात आली.

या उपक्रमात सहाय्यक कृषी अधिकारी संदीप सरक, ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत शिंदे, ग्राम महसूल अधिकारी जयश्री सुतार, सौरभ भागवत, विनायक जगताप उपस्थित होते.

मुख्याध्यापिका शोभा गायकवाड, उपशिक्षिका प्रमिला साळुंखे आणि प्रियंका भापकर यांनी सहभाग घेतला. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना सकस आहार व आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी सर्वांनी दक्ष राहून पार पाडावी – तुषार ठोंबरे

पुणे, दि.१०: महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघ...

आरोग्य जनजागृती व समुपदेशन शिबिर

सेवा संकल्प अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना आरोग्य, ईएसआयसी सुविधा व व्यसनमुक्तीबाबत...

राहुल गांधींचा चेन्नईत विद्यार्थ्यांशी संवाद; हिंदी लादण्याचा आरोप, मतचोरीवरून केंद्रावर हल्लाबोल

चेन्नई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी...

दिल्लीत हजारो जणांची धरपकड : सोनम वांगचुक म्हणाले ,’सोडा त्यांना , अन्यथा मी आंदोलन करेल

ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवालांसह अनेक नेत्यांवर कारवाई; 38 हजार...