पुण्यात १ नोव्हेंबरला भव्य ‘राष्ट्रीय एकता दौड’;४० हजारांहून अधिक नागरिकांच्या सहभागाची अपेक्षा

Date:

  • संयोजक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
  • राष्ट्रीय एकात्मता, तंदुरुस्ती आणि व्यसनमुक्तीचा संदेश

पुणे (प्रतिनिधी) भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या ‘राष्ट्रीय एकता दिवसाचे’ औचित्य साधून रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यात भव्य ‘पुणे रन फॉर युनिटी २०२६’ अर्थात ‘राष्ट्रीय एकता दौड’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ४० हजारांहून अधिक पुणेकर सहभागी होतील, अशी अपेक्षा असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री या उपक्रमाचे मुख्य संयोजक मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याबरोबरच नागरिकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीविषयी जागरूकता निर्माण करणे आणि विशेषतः युवा पिढीला व्यसनमुक्त, आरोग्यसंपन्न जीवनशैलीसाठी प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर हा दिवस सन २०१४ पासून माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या राष्ट्रीय भावनेतून पुण्यात आयोजित करण्यात येणारी ‘राष्ट्रीय एकता दौड’ ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून समाजातील सर्व घटकांना एका व्यासपीठावर आणणारा व्यापक लोकसहभागाचा उपक्रम असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

गेल्या वर्षी २५ हजारांचा सहभाग; यंदा ४० हजारांचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट

गेल्या वर्षी आयोजित ‘पुणे रन फॉर युनिटी २०२५’ला पुणेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. या उपक्रमात २५ हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. त्यापैकी १० हजारांहून अधिक स्पर्धात्मक धावपटूंनी १० किलोमीटर आणि हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदविला होता. केनिया, इथिओपिया यांसारख्या देशांतील आंतरराष्ट्रीय धावपटूंसह भारतातील नामांकित धावपटूंच्या सहभागामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.

यंदाच्या उपक्रमासाठी आतापर्यंत २० हजारांहून अधिक नोंदणी प्राप्त झाल्या असून, ४० हजारांहून अधिक नागरिक सहभागी होतील, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला. यामध्ये व्यावसायिक धावपटू, विद्यार्थी, युवक-युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, विविध संस्थांचे प्रतिनिधी, कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी आणि कुटुंबीयांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे.

पाच विविध गटांत धावस्पर्धा; १० लाखांहून अधिक रोख पारितोषिके

‘पुणे रन फॉर युनिटी २०२६’मध्ये २१ किलोमीटर हाफ मॅरेथॉन, १० मैल स्पर्धात्मक धाव, १० किलोमीटर स्पर्धात्मक धाव, ५ किलोमीटर फन रन आणि ३ किलोमीटर फॅमिली व बिगिनर रन अशा पाच गटांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अनुभवी धावपटूंबरोबरच प्रथमच धावण्याच्या उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांनाही संधी मिळणार आहे.

स्पर्धात्मक धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध गटांमध्ये एकूण १० लाख रुपयांहून अधिक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. पात्र महिला व पुरुष धावपटूंना स्पर्धेच्या नियमानुसार ही पारितोषिके प्रदान करण्यात येतील. यंदाही देश-विदेशातील नामांकित धावपटू सहभागी होणार असल्याने या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त होईल, असे मोहोळ यांनी सांगितले.

‘नशामुक्त युवा – विकसित भारत’चा विशेष संदेश

यंदाच्या राष्ट्रीय एकता दौडचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ‘नशामुक्त युवा – विकसित भारत २०२६’ ही संकल्पना. तरुणाईमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेबाबत जागरूकता निर्माण करून क्रीडा, व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती आणि सकारात्मक जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे.

‘नशामुक्त युवा – सशक्त युवा – विकसित भारत’ या विचारातून युवकांना व्यसनांपासून दूर ठेवत त्यांच्यात शिस्त, आत्मविश्वास, आरोग्याविषयी जागरूकता आणि राष्ट्रनिर्माणात सक्रिय योगदान देण्याची प्रेरणा निर्माण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. निरोगी युवा पिढी हीच विकसित भारताची खरी ताकद असून, या विचाराला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा प्रयत्न असल्याचे मोहोळ यांनी नमूद केले.

या उपक्रमाला पुणे महानगरपालिका, पुणे पोलीस यांच्यासह अमूल, महामेट्रो पुणे, ग्लोबल जीएचए अँड स्कूल ऑफ एव्हिएशन, लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटी, चितळे बंधू, विक्रम गायकवाड ग्रुप, मदर डेअरी, बिग एफएम ९५, फ्लाय९१, झेंडू, ग्लुकॉन-डी आणि मॅक्स प्रोटीन यांसारख्या विविध संस्था व ब्रँड्सचे सहकार्य लाभत असल्याची माहिती मोहोळ यांनी दिली.

राष्ट्रीय एकात्मतेबरोबरच निरोगी आणि व्यसनमुक्त युवा पिढी घडविण्याचा संकल्प – मुरलीधर मोहोळ

“सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या एकात्मतेसाठी दिलेले योगदान आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘पुणे रन फॉर युनिटी’ हा केवळ धावण्याचा उपक्रम नसून राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणारा लोकसहभागाचा उत्सव आहे.

पुण्याला समृद्ध क्रीडा परंपरा लाभली आहे. या शहराने देशाला अनेक गुणवंत खेळाडू दिले आहेत. हीच क्रीडा संस्कृती अधिक व्यापक करत प्रत्येक नागरिकाला तंदुरुस्तीच्या चळवळीशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. विशेषतः युवा पिढी व्यसनांपासून दूर राहून क्रीडा, व्यायाम आणि सकारात्मक जीवनशैलीकडे वळावी, हा यंदाच्या आयोजनामागील महत्त्वाचा विचार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत – श्रेष्ठ भारत’ आणि ‘विकसित भारत’ या संकल्पनांना लोकसहभागातून बळ देण्याचा आमचा संकल्प आहे. गेल्या वर्षी पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यंदाही हा उपक्रम विक्रमी सहभागाने यशस्वी होईल, असा विश्वास आहे. मुख्य संयोजक म्हणून या उपक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी सांभाळताना पुण्यातील प्रत्येक घटकाला या चळवळीशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुणेकरांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अधिक व्यापक करावा.”

— मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा मुख्य संयोजक, पुणे रन फॉर युनिटी २०२६

पुणेकरांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक बांधिलकी, शारीरिक तंदुरुस्ती आणि व्यसनमुक्तीचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘पुणे रन फॉर युनिटी २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. पुणेकरांनी रविवार, १ नोव्हेंबर रोजी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रीय एकात्मतेच्या या लोकचळवळीला बळ द्यावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा मुख्य संयोजक मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दिल्लीत हजारो जणांची धरपकड : सोनम वांगचुक म्हणाले ,’सोडा त्यांना , अन्यथा मी आंदोलन करेल

ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवालांसह अनेक नेत्यांवर कारवाई; 38 हजार...

‘इतक्याही लाजा विकू नका’; हॉस्टेल-पीजींना पोलिसांची नोटीस पाहून रोहित पवार संतापले

विद्यार्थ्यांची नावे, पत्ते, आधारकार्ड, टेनंट व्हेरिफिकेशनसह माहिती २४ तासांत...

दिल्ली आंदोलनावर पोलिसांचा कडक फास; माजी मुख्यमंत्री, वकील, पत्रकारांसह हजाराहून अधिक जण ताब्यात

नवी दिल्ली : जंतरमंतरकडे कूच करणाऱ्या आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी...

कोठडीत जाण्यापूर्वीच अभिजीत दिपकेंचा रेकॉर्डेड संदेश; “आता आंदोलन अजिंक्य शिंदे लीड करणार”

दिपके, सौरव दास, आशुतोष रांका विमानातूनच ताब्यात; ध्रुव राठीही...