अरेरे… महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले …

Date:

CJPच्या जंतर-मंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ‘हम भारत के लोग’ची मुंबईत निदर्शनांची हाक; पोलिसांनी परवानगी नसल्याचे सांगितले

मुंबई – महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले.तुषार गांधी यांना सध्या अंधेरीच्या डी. एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये ठेवले आहे.

CJPच्या जंतर-मंतर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ‘हम भारत के लोग’ची मुंबईत निदर्शनांची हाक; पोलिसांनी परवानगी नसल्याचे सांगितले

मुंबई : महात्मा गांधी यांचे पणतू आणि ‘हम भारत के लोग’ या संघटनेचे अध्यक्ष तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीकडून आयोजित आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात दुपारी साडेतीन वाजता निदर्शने करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्या आंदोलनासाठी जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना वांद्रे परिसरातून ताब्यात घेतले आणि अंधेरीतील डी. एन. नगर पोलीस ठाण्यात नेले.

तुषार गांधी यांनी आंदोलनापूर्वी सोशल मीडियावरून मुंबईकरांना ऑगस्ट क्रांती मैदानात जमण्याचे आवाहन केले होते. हे आंदोलन दिल्लीतील CJPच्या जंतर-मंतर आंदोलनाला समर्थन देण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. या निदर्शनासाठी ते स्वतः उपस्थित राहणार असून कारवाईला सामोरे जाण्यासही तयार असल्याचे त्यांनी यापूर्वी म्हटले होते.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नसल्याचे सांगितले. गावदेवी पोलीस ठाण्याकडे या आंदोलनासाठी अर्ज प्राप्त झालेला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ऑगस्ट क्रांती मैदान हे अधिकृत आंदोलनस्थळ नसून तेथे आंदोलन करण्यासंदर्भात न्यायालयीन निर्बंध असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

तुषार गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यासोबत त्यांच्या संघटनेतील काही कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी मात्र ही अटक नसून प्रतिबंधात्मक ताबा असल्याचे स्पष्ट केले. तुषार गांधी यांनी सुरुवातीला सोशल मीडियावर आपण अटकेत असल्याचे म्हटले होते; मात्र मुंबई पोलिसांनी त्यांना अधिकृतपणे अटक करण्यात आलेली नसल्याचे सांगितले.

दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. मतदार याद्यांतील कथित अनियमितता आणि विशेष सखोल पुनरिक्षणाच्या प्रक्रियेवरून CJPने ही भूमिका घेतली आहे. दिल्ली पोलिसांनी जंतर-मंतरवरील आंदोलनाला परवानगी नाकारली असून, देशातील विविध भागांतून दिल्लीकडे जाणाऱ्या आंदोलनकर्त्यांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबईतील आंदोलनालाही पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. तरीही तुषार गांधी आणि त्यांच्या संघटनेने लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी ऑगस्ट क्रांती मैदानात शांततापूर्ण निदर्शने करण्याची घोषणा केली होती. आंदोलन सुरू होण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेतल्याने या कारवाईकडे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोठडीत जाण्यापूर्वीच अभिजीत दिपकेंचा रेकॉर्डेड संदेश; “आता आंदोलन अजिंक्य शिंदे लीड करणार”

दिपके, सौरव दास, आशुतोष रांका विमानातूनच ताब्यात; ध्रुव राठीही...

दिल्ली विमानतळावर उतरतानाच CJP नेते अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका ताब्यात

जंतर-मंतर आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांची कारवाई; CJPचा तीव्र निषेध, तात्काळ...