ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय कलाविश्व आणि समाजकारणाची मोठी हानी-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Date:


​मुंबई दि.8:- भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड, दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या जाण्याने मराठी तसेच भारतीय कलाविश्वाने एक हरहुन्नरी आणि संवेदनशील कलाकार गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ​आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, “नाना पाटेकर हे केवळ एक उत्कृष्ट अभिनेते नव्हते, तर अभिनयाचा अस्सल आविष्कार आणि संवेदनशील सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने त्यांनी अनेक व्यक्तिरेखा अजरामर केल्या. ‘नटसम्राट’, ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’ यांसारख्या कलाकृतींमधून त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर उमटवलेली अमीट छाप रसिकप्रेक्षकांच्या मनात सदैव कायम राहील.” ​नाना पाटेकर आणि पवार कुटुंबातील आपुलकीच्या संबंधांचा उल्लेख करताना त्या भावूक झाल्या. “नानांचे आदरणीय अजितदादांशी अतिशय जिव्हाळ्याचे, आपुलकीचे आणि स्नेहाचे संबंध होते. कौटुंबिक सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात ते नेहमी पाठीशी उभे राहिले. त्यामुळे त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी ही माझ्यासाठी आणि आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत वैयक्तिक आणि विशेष दुःखद आहे,” असे त्या म्हणाल्या. “अभिनयातील यशाच्या शिखरावर असतानाही नानांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचे भान कधीही सुटू दिले नाही. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी समाजातील वंचित घटक, दुष्काळग्रस्त आणि शेतकरी बांधवांसाठी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी राहील.कलेचा आणि सामाजिक सेवेचा ध्यास घेतलेल्या या अष्टपैलू, संवेदनशील कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली,” अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नाना पाटेकरांचे पार्थिव पुण्यात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

राज्य सरकारतर्फे मानवंदना; डोणजे येथील फार्महाऊसवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पुणे...

नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; अभिनय, संवेदनशीलतेचा भारदस्त चेहरा काळाच्या पडद्याआड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना...

सीएसआर गुंतवणुकीचा सामाजिक परिणाम मोजणे आवश्यक ; पुण्यात राष्ट्रीय सल्लामसलत

पुणे, दि. ८ : कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR) अंतर्गत...