“अजितदादांचे नाव न वापरता निवडणूक लढवा”; सुनेत्रा पवारांचे बंडखोरांना थेट आव्हान

Date:

पुरुषोत्तम जगतापांचे प्रत्युत्तर — “अजितदादा आमच्या हृदयात आहेत; नाव वापरणारच”

पुणे : बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत बंडखोरीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीतून बंडाचा झेंडा उभारलेल्या पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या पाठिंब्याने ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ रिंगणात उतरवले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बंडखोरांना उद्देशून, “अजितदादांचे नाव न वापरता स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवा” असे थेट आव्हान दिले.

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, अजित पवार यांच्या नेतृत्वाचा आणि नावाचा आधार घेऊन त्यांच्या कुटुंबाविरोधात निवडणूक लढवणे योग्य नाही. “स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असेल तर अजितदादांचे नाव वापरू नका. नाव दादांचे आणि नाराजी कुटुंबावर, हे कसलं समीकरण?” असा सवाल त्यांनी केला.

या आव्हानाला पुरुषोत्तम जगताप यांनीही प्रत्युत्तर दिले. “कारखान्याच्या विकासासाठी आणि सभासदांच्या हितासाठी आम्ही स्वतंत्र भूमिका घेतली आहे. अजितदादा आमच्या हृदयात आहेत. त्यांना सभासदांच्या मनातून कसे काढणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी अजित पवारांचे नाव वापरण्याची भूमिका कायम ठेवली असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनेलला दिवंगत अजित पवार यांचे नाव आणि छायाचित्र वापरण्यास मनाई केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या निवडणुकीतील ‘अजितदादा’ नावाभोवतीचे राजकारण आणखी तीव्र झाले आहे.

अजित पवारांचा फ्लेक्स हटवला

पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने अजित पवार यांच्या नावाचा किंवा छायाचित्राचा वापर करण्यापूर्वी कुटुंबीयांची परवानगी घ्यावी, असे आवाहन केल्यानंतर पुरुषोत्तम जगताप यांनी वानेवाडी येथील प्रचार मेळाव्यातील अजित पवारांचा फ्लेक्स काढून टाकला. मात्र “फोटो लावला किंवा नाही, अजितदादा आमच्या मनात आहेत,” अशी भूमिका त्यांनी घेतली.

83 उमेदवारांमध्ये तिरंगी लढत

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकूण 601 अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर 514 अर्ज पात्र ठरले, त्यापैकी 431 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 83 उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात आहेत.

या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल, युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) समर्थित पॅनेल आणि भाजपच्या पाठिंब्याने पुरुषोत्तम जगताप यांचे पॅनेल अशी तिरंगी लढत रंगणार आहे.

अजित पवारांच्या नावावरून रंगलेली ही नवी राजकीय लढाई आता सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीतील सर्वात मोठा मुद्दा बनली आहे. एका बाजूला सुनेत्रा पवार यांनी “स्वकर्तृत्वावर लढा” असे आव्हान दिले आहे, तर दुसऱ्या बाजूला जगतापांनी “अजितदादा आमच्या हृदयात आहेत” असे प्रत्युत्तर दिल्याने प्रचार आणखी चुरशीचा झाला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘बाबासाहेबांनी अधिकार दिले; आपण त्यांची किंमत विसरलो’ : अभिजित दिपके

MPSC आंदोलनात सरकारवर हल्लाबोल; ‘धर्म-जात नव्हे, शिक्षण-रोजगाराच्या प्रश्नांवर मतदान...

ब्राह्मण समाजात फसवणूक करण्याची मानसिकता नाही – आशिष दामले

पुणे - ब्राह्मण समाजात फसवणूक करण्याची मानसिकता नसल्याने बॅंकानी...

युगेंद्र पवारांचा घणाघात; “भाजप मागच्या दराने बारामतीत येण्याचा प्रयत्न करतोय”

‘किटलीशिवाय कपबशी भरत नाही’; सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगतापांवर...

डेझर्ट नॅशनल पार्कमध्ये दोन नर माळढोक पक्षी पुन्हा नैसर्गिक अधिवासात

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते जैसलमेरमध्ये मुक्तता;...