गांधींचा सत्याग्रह विश्वमानवतेसाठी – डॉ. उल्हासदादा पवारडब्ल्यूपीयूमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

Date:

पुणे: “संपूर्ण जग आज युद्धाच्या छायेत अस्वस्थ आहे. अशा वेळी गांधी जयंती ही संयुक्त राष्ट्रातर्फे जागतिक अहिंसा दिन म्हणून संपूर्ण जगात साजरी केली जाते, हे सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह हा मूलमंत्र गांधीजींनी दिला. गांधीजींचा सत्याग्रह हा विश्वमानवतेसाठी होता,” असे विचार ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. उल्हासदादा पवार यांनी व्यक्त केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, माईर्स एमआयटी शिक्षण समूह व पीस विभागाच्या वतीने संत ज्ञानेश्वर मंडपात आयोजित “स्मरण महामानवांचे” या अभिवादन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.

यावेळी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, एमआयटीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. एस. एन. पठाण, प्रा. डॉ. मिलिंद पात्रे, डॉ. महेश थोरवे, लेखक अनिल जोशी, डॉ. विनोदकुमार जाधव, विष्णू भिसे, कर्नल तांदळे आणि बिपीन जोशी उपस्थित होते.

डॉ. उल्हासदादा पवार म्हणाले, “गांधीजींनी अस्पृश्यता निवारणाला प्राधान्य दिले. सर्वधर्मसमभाव आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचा विचार समाजात रुजावा, तसेच भारतातील कोणताही समाज जाती आणि धर्माच्या आधारावर विभागला जाऊ नये, असा त्यांचा विचार होता. मानवता, समता व नैतिकता या तीन मूल्यांवर आधारित सत्याग्रहातून संघर्ष उभा करण्याचे तत्त्व न्या. रानडे यांनी गांधीजींना दिले. लाल बहादूर शास्त्री हे गांधीजींचे शिष्य होते. शांतता, नम्रता आणि तत्त्वांप्रती निष्ठा ठेवून शास्त्रींनी देशसेवा केली. गांधी आणि शास्त्रींच्या विचारांची जाणीव ठेवून त्याच मूल्यांवर डॉ. विश्वनाथ कराड यांचे कार्य सुरू आहे.”

विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “सत्य, अहिंसा आणि शांती हेच खरे मानवी जीवनाचे तत्त्व आहे. धर्मग्रंथ हेच खरे जीवनग्रंथ आहेत हे ओळखून गांधीजी सतत शांतीच्या मार्गाने वाटचाल करत राहिले. गांधींचा आणि बुद्धांचा देश म्हणूनच आज जगात भारताची ओळख आहे. आज जागतिक स्तरावर युद्धजन्य स्थितीत गांधीजींच्या सत्य, अहिंसा, प्रेम, शांती आणि विश्वमानवतेच्या विचारांची गरज आहे. सत्याचे सातत्य टिकवणारे सत्याग्रही महात्मा गांधी हेच आज विश्वशांतीचा आणि विश्वकल्याणाचा एकमेव विचार आहेत.”

डॉ. मिलिंद पांडे म्हणाले, “या देशात गांधींच्याच विचारांची गरज आहे. एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठात गांधीजींचे विचार अभ्यासक्रमात शिकवले जातात. वर्ल्ड पार्लमेंटच्या माध्यमातून हे विचार सर्वांपर्यंत पोहोचवत राहू.”

डॉ. एस. एन. पठाण म्हणाले, “हिंदू-मुस्लिम भाईचारा देणारी ही व्यक्तिमत्त्वे होती. सर्वजण एकाच ईश्वराची लेकरे आहेत. नव्या पिढीला महात्मा गांधी सांगायला हवेत.”

विष्णू भिसे म्हणाले, “गीतेचा सिद्धांत अध्यात्माच्या माध्यमातून गांधीजींनी कृतीत उतरवला. या देशात सत्य, अहिंसा आणि नैतिकतेचा पाया घातला. जगातील बलाढ्य देशही आज गांधीजींचे अनुयायी होऊ लागले आहेत.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद पात्रे यांनी केले. डॉ. भागवत बिऱ्हाडी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. महेश थोरवे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘बाबासाहेबांनी अधिकार दिले; आपण त्यांची किंमत विसरलो’ : अभिजित दिपके

MPSC आंदोलनात सरकारवर हल्लाबोल; ‘धर्म-जात नव्हे, शिक्षण-रोजगाराच्या प्रश्नांवर मतदान...

ब्राह्मण समाजात फसवणूक करण्याची मानसिकता नाही – आशिष दामले

पुणे - ब्राह्मण समाजात फसवणूक करण्याची मानसिकता नसल्याने बॅंकानी...

“अजितदादांचे नाव न वापरता निवडणूक लढवा”; सुनेत्रा पवारांचे बंडखोरांना थेट आव्हान

पुरुषोत्तम जगतापांचे प्रत्युत्तर — “अजितदादा आमच्या हृदयात आहेत; नाव...

युगेंद्र पवारांचा घणाघात; “भाजप मागच्या दराने बारामतीत येण्याचा प्रयत्न करतोय”

‘किटलीशिवाय कपबशी भरत नाही’; सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगतापांवर...