‘पुणे ग्रँड टूर २०२६’ साठी महावितरण सज्ज; ५०० हून अधिक फिडर पिलर्स आणि रोहित्रांचा कायापालट

Date:

पुणे, दि. ७ जानेवारी २०२६: भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची मल्टिस्टेज सायकलिंग स्पर्धा ‘पुणे ग्रँड टूर–२०२६’ येत्या १९ ते २३ जानेवारी दरम्यान पुणे जिल्ह्यात रंगणार आहे. या जागतिक स्पर्धेच्या स्वागतासाठी संपूर्ण पुणे शहर सजले असून, महावितरणनेही या सौंदर्यीकरण मोहिमेत मोठे योगदान दिले आहे. स्पर्धेच्या मार्गावरील वीज यंत्रणेची स्वच्छता आणि रंगरंगोटीचे काम महावितरणने युद्धपातळीवर हाती घेतले आहे.

ही स्पर्धा ४३७ किलोमीटर अंतराची असून, ३५ देशांतील दिग्गज खेळाडू यात सहभागी होत आहेत. या पार्श्वभूमीवर, सायकलिंग मार्गावरील सुमारे ५०० हून अधिक फिडर पिलर्स आणि रोहित्र स्वच्छ करण्यात येत आहेत. जुन्या, गंजलेल्या आणि अनधिकृत पोस्टर्समुळे विद्रुप झालेल्या या यंत्रणेची रंगरंगोटी केली जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पुण्याचे रूप ‘स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध शहर’ म्हणून दिसावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

केवळ सौंदर्यीकरणच नव्हे, तर महावितरणकडून या यंत्रणेची अंतर्गत देखभाल आणि दुरुस्तीही केली जात आहे. यामुळे स्पर्धेदरम्यान अखंडित वीजपुरवठा राहील आणि तांत्रिक बिघाडामुळे होणारे संभाव्य अपघात टाळता येतील.

विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा


“वीज यंत्रणा ही सार्वजनिक मालमत्ता असून तिचे विद्रुपीकरण करणे हा गुन्हा आहे. काही संस्था किंवा व्यक्ती जाहिराती चिटकावून ही यंत्रणा खराब करतात. यापुढे अशा विद्रुपीकरण करणाऱ्यांवर महावितरणकडून कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा महावितरण पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी दिला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पीएमसी एम्प्लॉईज युनियनच्या ६७ व्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन; दिव्यांग विद्यार्थी व तृतीयपंथी सुरक्षा रक्षकांना दिवाळी फराळ वाटप

कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संघटनेचे अध्यक्ष बजरंग पोखरकर यांनी मांडला वर्षभराच्या...

अज्ञानाचा अंधकार दूर करणाऱ्या गीतांनी साजरी झाली महात्मा फुले यांचे द्विजन्मशताब्दी वर्ष

पुणे, दि. ५ नोव्हेंबर २०२६ : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या...