खडकवासला मतदारसंघात दृष्टिहीन मतदारांसाठी ‘ब्रेल’मधून मतदार चिठ्ठी, विशेष मदतनीसाची सोय

Date:

पुणे: पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदारसंघात यंदा 55 दृष्टिहीन मतदारांसाठी विशेष ब्रेल लिपीतून मतदार चिठ्ठी (स्लिप) उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 14 उमेदवार नशीब आजमावत असलेल्या या मतदारसंघात एकूण 507 मतदान केंद्रे असणार आहेत. दृष्टिहीन मतदारांच्या सोयीसाठी त्यांच्याकरिता वेगळे केंद्र न ठेवता, त्यांच्या राहण्याच्या पत्त्याच्या नोंदीनुसार जवळच्या मतदान केंद्रात त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. ज्या केंद्रांवर दृष्टिहीन मतदार असतील, त्या ठिकाणी ब्रेल लिपीत स्लिपसह मदतनीसाची सोय देखील उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे दिव्यांग कक्षाचे नोडल अधिकारी विनोद हाके आणि सहाय्यक अधिकारी प्रदीप पारखी यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रत्येक मतदाराला त्यांच्या मतदान केंद्राची माहिती असलेली चिठ्ठी (व्होटर स्लिप) दिली जाते. दृष्टिहीन मतदारांना यामध्ये अधिक सहकार्य मिळावे म्हणून खडकवासला मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रेल लिपीतून चिठ्ठ्या तयार करण्यात आल्या आहेत.
या उपक्रमामुळे दृष्टिहीन मतदारांना मतदान प्रक्रियेत सहजता लाभेल आणि या विशेष सोयीमुळे त्यांना मतदान करता येईल. या मतदार चिठ्ठ्यांमुळे मतदारसंघातील दृष्टिहीन मतदारांना मतदानाच्या ठिकाणी अधिक सहकार्य मिळेल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्राच्या मुळावर उठलेले विनाशकारी वाढवण बंदर रद्द झाल्याशिवाय लढा थांबणार नाही: हर्षवर्धन सपकाळ

वाढवण बंदर विरोधी जनआक्रोश मोर्चाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा, सरकारच्या...

‘महाराष्ट्रातील उच्चशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारले’; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळदादा तिवारी यांचा दावा

‘हा संवैधानिक लोकशाहीच्या रक्षणार्थ देशव्यापी संदेश’; शिक्षक-पदवीधर निवडणुका मतपत्रिकेवरच...

‘आमच्याकडेही मोठा शब्दकोश; पण दोस्तीत कुस्ती नको!’ आनंद परांजपेंचा भाजपला इशारा

धंगेकरांना ‘माकडछाप’ म्हटल्यावरून शिवसेना आक्रमक; मित्रपक्षांवरील टीका थांबवण्याची मागणी,...