खादी महोत्सवानिमित्त सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रदर्शनाचे आयोजन

Date:

पुणे, दि.२: खादी वस्त्राला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तसेच खादीचा प्रचार व वापर वाढविण्यासाठी महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांतर्गत ५ ते ९ ऑगस्ट २०२४ या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे खादी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. आर. खरात यांनी कळविले आहे.

परदेशी मालाचा बहिष्कार करुन असहकार चळवळ ७ ऑगस्ट १९०५ पासून खादी उत्पादन व वापराची मोहिम सुरू झाली. या कारणामुळे ७ ऑगस्ट २०१५ पासून भारत सरकारच्यावतीने आंतरराष्ट्रीय ‘खादी व हातमाग दिवस’ पाळण्यात येतो. या दिनानिमित्त आयोजित खादी महोत्सवात खादी कापड, राष्ट्रध्वज व मंडळाच्या महाबळेश्वर येथील शुद्ध व सेंद्रिय मध उपलब्ध होणार आहे. सर्व नागरिकांनी सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. खरात यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

इकडे दिवाळीचा झगमगाट, तिकडे दुष्काळाचा आघात!

पुण्यातील लक्ष्मी, कुमठेकर आणि बाजीराव रस्ते विद्युत रोषणाईने उजळले;...

महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणार-श्रीनाथ भिमाले

पुणे, ता. २९ : पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी...

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वीजवाहिन्या भूमिगत करणार

पुणे, ता. २९ : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अभय अरण्य सोसायटी...