केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग:हेलिपॅडवर उतरण्यापूर्वी 8 वेळा गिरक्या घेतल्या; 7 जणांचे वाचले प्राण(व्हिडीओ)

Date:

रुद्रप्रयाग – आज सकाळी केदारनाथ धाममध्ये हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानातील वैमानिक आणि सहा प्रवासी सुखरूप आहेत. हे प्रवासी सिरसी हेलिपॅडवरून केदारनाथ धामच्या दर्शनासाठी जात असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हेलिपॅडवर उतरण्यापूर्वी ते हवेत गरगरले. यानंतर त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. डीजीसीएने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, हे हेलिकॉप्टर क्रेटन एव्हिएशन कंपनीचे आहे. हेलिपॅडच्या 100 मीटर आधी ते हवेत गिरक्या घेऊ लागले. कॅप्टन कल्पेश हे हेलिकॉप्टर उडवत होते.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून प्रवाशांना मदत करत मंदिरात नेले.

शिवाजी, उलुबंकट चलम, महेश्वरी, सुंदरा राज, सुमथी, मयूर बागवानी हे तमिळनाडूतील सहा भाविक हेलिकॉप्टरमध्ये होते.
उत्तराखंडमधील चार धाम यात्रेदरम्यान 12 दिवसांत (23 मेपर्यंत) 49 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुसंख्य भक्त असे आहेत जे कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त होते. ही आकडेवारी राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाने जाहीर केली आहे.

यातील सर्वाधिक 23 मृत्यू केदारनाथ धाममध्ये झाले आहेत. यानंतर यमनोत्री धाममध्ये 12 आणि बद्रीनाथ धाममध्ये 11 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसेच गंगोत्री धाममध्ये आतापर्यंत तीन भाविकांचा मृत्यू झाला आहे.
प्रवाशांची संख्या जास्त असल्याने मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार 31 मेपर्यंत ऑफलाइन नोंदणी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नोंदणीशिवाय प्रवास करण्यासाठी आलेले प्रवासी आता चिंतेत पडले आहेत. गुरुवारी 300 हून अधिक यात्रेकरू हरिद्वारमधील सिटी मॅजिस्ट्रेट कार्यालयात पोहोचले. ते प्रवासाची परवानगी मागत होते. चारधाम यात्रेला गेल्याशिवाय परत जाणार नाही, असे ते सांगतात. मात्र, गर्दी पाहता प्रशासनाकडून कडक कारवाई सुरूच आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शस्त्रांच्या प्रदर्शनासाठी कायमस्वरूपी जागा मिळावी यासाठी प्रयत्न करू; आ. नीलम गोऱ्हे

शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनात २५० हून अधिक ऐतिहासिक शस्त्रे पुणे: शस्त्रांची...

रॉकेट आणि आकाशात उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी! वाढत्या आगीच्या घटनांनंतर महापालिकेचा मोठा निर्णय

दिवाळीच्या दिवशी आगीच्या १४२ वर्दी; त्यापैकी १३७ घटना फटाक्यांशी...

‘ अराजकवादी कोण? आम्ही कि तुम्ही ’ मुख्यमंत्र्यांना थेट सवाल..

‘गोकुळ’वर सत्तेच्या जोरावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न; भाजपकडून लोकशाही मूल्यांची...

फटाक्याच्या स्फोटात १० वर्षीय मुलाचा करुण अंत!

ऐन दिवाळीत दिल्लीतील कुटुंबावर दुःखाचा डोंगर; रुग्णालयावर कुटुंबीयांचा हलगर्जीपणाचा...