रावेतमध्ये ९८ लाख रुपयांची वीजचोरी,उघडकीस; फौजदारी गुन्हा दाखल

Date:

पुणे, दि. ४ जुलै २०२२: रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने वीजमीटरमध्ये फेरफार करून बांधकामासाठी सुरु असलेली २ लाख ४ हजार २९२ युनिटची म्हणजे ९८ लाख ८ हजार ४४० रुपयांची वीजचोरी महावितरणच्या भरारी पथकाने नुकतीच उघडकीस आणली आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  

याबाबत माहिती अशी की, रावेत येथील रवी खिलुमन ओछानी या ग्राहकाकडील वीजमीटर व संचाची महावितरणच्या भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आली. यामध्ये वीजमीटरमध्ये रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने फेरफार करून इमारतीच्या बांधकामासाठी गेल्या १८ महिन्यांमध्ये २ लाख ४ हजार २९२ युनिटची म्हणजे ९८ लाख ८ हजार ४४० रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. याप्रकरणी रवी खिलुमन ओछानी विरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ मधील कलम १३५, १३६, १३७ व १३८ नुसार रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  

वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक कमांडर शिवाजी इंदलकर यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे उपकार्यकारी अभियंता अनिल कुराडे, सहायक सुरक्षा व अंमलबजावणी अधिकारी शुभांगी पतंगे व सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ संपन्न

विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग राष्ट्र उभारणीसाठी करावा-उपराष्ट्रपती...

दीदी कृष्णा कुमारी यांच्या ‘बियॉन्ड द डॉट’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते पुस्तकाचे अनावरण!

साधु वासवानी मिशनच्या कार्यक्रमात साहित्य, भक्तिसंगीत आणि जीवनमूल्यांचा संगम;...

महावितरणचा वीजचोरांना दणका:तीन दिवसात २५० वीजचोरीची प्रकरणे उघड

६ कोटी २७ लाख रुपयांच्या वीजचोरीचा सुरक्षा व अंमलबजावणी...

शेड पाडल्या, पण अनधिकृत व्यवसाय सुरूच! महापालिकेची अतिक्रमण कारवाई केवळ दिखावा ठरणार?

फ्रंट व साईड मार्जिनमधील अनधिकृत व्यवसायांवर फौजदारी कारवाई करा;...