पुणे :पिरंगुट – उरावडे औद्योगिक वसाहतीमधील सर्वात मोठी आस्थापना असणाऱ्या इंडो शॉटले कंपनीमध्ये कंपनी व्यस्थापनाकडून ६८२ कामगार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत कोविशिल्ड लस देण्यात आली. दिनांक 3 जुलै आणि 10 जुलै असा दोन दिवस उपक्रम इंडो शॉटले व्यवस्थापणाने कंपनीच्या उरावडे प्लांटमध्ये राबविला, अशी माहिती कामगार संघटनेचे सरचिटणीस सागर कांजणे यांनी दिली. जागतिक महामारी म्हणून समोर आलेल्या कोरोनोच्या संकटाचं गांभीर्य लक्ष्यात घेऊन कंपनी प्रशासनाचा कणा असणाऱ्या कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत लस देण्याचा हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत मोठया प्रमाणात लसीकरण मोहिम पार पडली. या कार्यक्रमास इंडो शॉटले कामगार संघटना यांचे मोलाचं सहकार्य मिळाले.
या उपक्रमाबद्दल मत व्यक्त करताना व्यवस्थापकीय संचालक राव साहेब म्हणाले, ‘कोरोनो लस घेणे काळाची गरज असून, त्याने तुमचा आत्मविश्वास आणि उमेद कित्तेक पटीने वाढणार आहे. कामगार आणि त्यांची सुरक्षितता यासाठी कंपनी अशी सुयोग्य पाऊले यापुढेही घेत राहील. सदर उपक्रमामुळे कामगार आणि कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण होते.’
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राव साहेब, मनुष्यबळ विकास व्यवस्थापक प्रमुख लक्ष्मण भोसले, एच आर विभागाचे व्यवस्थापक रविकिरण लिंबकर, सुरक्षितता विभागाचे अभिजीत गायकवाड, वरिष्ठ अधिकारी ओंकार कुलकर्णी, वरिष्ठ अधिकारी विवेक कोद्रे तसेच कामगार संघटनेचे अध्यक्ष अमोल मारणे, उपाअध्यक्ष विजय शेलार, सरचिटणीस सागर कांजणे, खजिनदार संदीप पाटील, सहसचिव भास्कर झोरे, सदस्य विजय जोशी, सदस्य निलेश सोळंकी इत्यादी प्रतिनिधीनीचा उपक्रम पार पडण्यासाठी हातभार लागला.