गोदरेज हाऊसिंग फायनान्सने केलेल्या पोस्ट ‘जनरेशन रेंट’ अभ्यासातील निष्कर्ष
ठळक वैशिष्ट्ये:
· ५४% पुणेकरांनी गेल्या एक वर्षात नवीन घराचा आणि गृह कर्ज पुरवठादाराचा शोध घ्यायला सुरुवात केली.
· सध्याच्या घडीला नवीन घर खरेदी करणे हा सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय असल्याचे शहरातील ३०% नागरिकांचे मत
· गृह कर्ज पुरवठादाराचा विचार करताना कर्जाला मान्यता आणि त्याची अंमलबजावणी व्हायला लागणारा वेळ आणि जोडीला ब्रँडची विश्वासार्हता आणि पारदर्शकता या महत्वाच्या गोष्टी.
पुणे (शरद लोणकर ): महामारी पश्चातच्या जगात आता स्वतःचे वैयक्तिक भविष्य सुरक्षीत करण्यासाठी पुण्यातील ८९% लोक भाड्याच्या घरातून स्वतःच्या मालकीच्या घरात जाण्याचा विचार करत असल्याचे गोदरेज हाऊसिंग फायनान्सने (GHF) अलिकडेच केलेल्या पोस्ट ‘जनरेशन रेंट’ अभ्यासातून उघड झाले आहे. महामारी पश्चातच्या जगात स्वतःचे भविष्य सुरक्षीत करण्यासाठी भारतीय ग्राहकांकडून मालमत्ता खरेदी, मालमत्ता निर्मिती आणि गुंतवणुकीचे पर्याय ठरविण्यासाठी कोणते घटक महत्वाचे ठरतात आणि ग्राहकांच्या वर्तणुकीत झालेले बदल यावर प्रकाश टाकण्यासाठी हा संशोधन अभ्यास करण्यात आला.
या अभ्यासातून पुढे असे उघड झाले की ५४% पुणेकरांनी गेल्या एक वर्षात नवीन घराचा आणि गृह कर्ज पुरवठादाराचा शोध घ्यायला सुरुवात केली असून सध्याच्या घडीला नवीन घर खरेदी करणे हा सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय असल्याचे शहरातील ३०% नागरिकांचे मत आहे. आपल्या स्वप्नातील घर खरेदी करणे ही नेहमीच प्राधान्याची गोष्ट राहिल्यामुळे २३% लोकांना नवीन घर खरेदी करायला आवडेल असे वाटते. गृह कर्ज पुरवठादाराचा विचार करताना कर्जाला मान्यता आणि त्याची अंमलबजावणी व्हायला लागणारा वेळ आणि जोडीला ब्रँडची विश्वासार्हता आणि पारदर्शकता या महत्वाच्या गोष्टी आहेत असे प्रतिसादकांना वाटते.
‘जनरेशन रेंट’ ही जगभरातील मिलेनियल्सशी संबंधित सु-व्यवस्थित घटना आहे. ग्राहकोपयोगी वस्तू आणि अगदी घरे विकत घेण्यापेक्षा भाड्याने घेणे पसंत करणाऱ्यांचा हा गट आहे. मात्र आधीच्या समजुतींना फाटा देत या अभ्यासाने ही बाब उघड केली आहे की साधारण ७६% भारतीय आता गुंतवणूक आणि जीवनशैलीसाठीचा पर्याय म्हणून भाड्याच्या घरातून स्वतःच्या मालकीच्या घरात जाण्याचा विचार करत आहेत.
गोदरेज हाऊसिंग फायनान्सने (GHF) अलिकडेच केलेल्या पोस्ट ‘जनरेशन रेंट’ अभ्यासातून हे उघड झाले आहे की जवळपास निम्म्या भारतीयांनी (४९.१३%) गेल्या एका वर्षांत स्वतःसाठीच्या घराचा आणि त्यासाठी गृहकर्ज वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. सध्याच्या घडीला नवीन घर खरेदी करणे हा सर्वोत्तम गुंतवणुकीचा पर्याय असल्याचे ३२.९% नागरिकांचे मत आहे तर न्यूनॉर्मल जीवनशैलीत घरून काम करणे ही मुख्य प्राधान्याची गोष्ट असल्यामुळे स्वतःच्या मालकीचे घर असणे ही सर्वाधिक प्राधान्याची गोष्ट असल्याचे मत १६% लोकांनी नोंदवले आहे.
या अभ्यासातून असेही दिसून आले की ‘वैयक्तिक सुरक्षितता’ या गोष्टीची व्याख्या करत असताना
२५.५% भारतीयांना स्वतःच्या मालकीचे घर असणे ही गोष्ट दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक महत्वाची गोष्ट वाटते तर ४०.६% भारतीयांचे मत मिळवलेली नोकरीची हमी ही गोष्ट यात प्रथम क्रमांकावर आहे.
गोदरेज हाऊसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष शहा या निष्कर्षांबद्दल बोलताना म्हणाले, “महामारीमुळे भारतीय ग्राहकांच्या पसंतीक्रमात सरळसरळ बदल झाला आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीतून भविष्य सुरक्षीत करण्याकडे त्यांचा कल आहे. परवडणे हा मुद्दा नेहमीच महत्वाचा राहिलेला असताना घर खरेदी करणे यासाठी कदाचित कधीच अधिक चांगली वेळ नसते. मालमत्ता म्हणून आणि आर्थिक सुरक्षिततेचा मुख्य आधारस्तंभ म्हणून हा नेहमीच महत्वाचा घटक राहिला आहे. या दीर्घकाळाच्या जबाबदारीसाठी ग्राहकांना योग्य आर्थिक सल्ला आणि मार्गदर्शन हवे असते. उत्पादन रचना अधिक नाविन्यपूर्ण, लवचिक करणे आणि डिजिटल पर्याय देणे तसेच घर खरेदी करण्यासाठीचा ग्राहकांचा आर्थिक प्रवास अधिक चांगला आणि सुकर करणे यासाठी आमची असलेली गरज दुपटीने वाढली असल्याचेही या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.”
वित्तीय भागीदाराची निवड करण्यासाठी योजनेची लवचिकता, ब्रँडची विश्वासार्हता आणि पारदर्शकता, डिजिटल सोयीसवलती आणि अंमलबजावणी व्हायला लागणारा वेळ या महत्वाच्या गोष्टी आहेत असे या अभ्यासातून उघड झाले आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकांच्या गरजांची पूर्तता झाल्यास त्याचे श्रेय मिळू शकते.
आजच्या काळातील वित्तीय ब्रँड्स निवडताना डिजिटल फर्स्ट आणि विनाअडथळा प्रक्रिया या दोन्ही बाबी लाभ आणि सुरुवातीच्या गोष्टी म्हणून विचारांत घेतल्या जातात असेही या अभ्यासातून दिसून आले आहे. सुरवातीपासून शेवटपर्यंत डिजिटल सुविधा पुरविणाऱ्या कंपन्या आणि सेवा यांना पारंपरिक वित्तीय प्रारूपे असणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेत ग्राहकांची अधिक पसंती मिळते.