महाराष्ट्रासह ८ राज्यांत दहशतवादी हल्ला होण्याचा संशय-कर्नाटकच्या पोलिसांकडून अॅलर्ट

Date:

मुंबई-श्रीलंकेत इस्टर संडेला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या किनारी राज्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. समुद्रमार्गे दहशतवादी या राज्यांमध्ये प्रवेश करण्याची शक्यता लक्षात घेता ही खबरदारी घेण्यात आली आहे. दरम्यान, कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रासह ८ राज्यांना पत्र लिहून दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेची सूचना देत अॅलर्ट दिला आहे.

कर्नाटक पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांना एका व्यक्तीने फोनवरुन सांगितले की, महाराष्ट्र, कर्नाटकसह इतर ६ राज्यांमध्ये हल्ला घडवून आणण्याचा कट रचला जात आहे. या माहितीनंतर कर्नाटकच्या पोलिसांनी महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, पुदुच्चेरी, गोवा या राज्यांच्या पोलीस प्रमुखांना पत्र लिहून अॅलर्ट राहण्यास सांगितले आहे.

ज्या व्यक्तीने कर्नाटक पोलिसांना फोन केला त्याने स्वतः एक ट्रक ड्रायव्हर असल्याचे सांगितले आहे. स्वामी सुंदर मुर्ती असे स्वतःचे नाव सांगताना शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता बंगळुरू शहर पोलिसांच्या कन्ट्रोल रुमला त्याने फोन केला होता. यामध्ये त्याने सांगितले होते की, देशातील आठ राज्यांमध्ये दहशतवादी स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत आहेत.

यावेळी दहशतवादी रेल्वे गाड्यांमध्ये स्फोट घडवून आणू शकतात असेही त्याने म्हटले आहे. तामिळनाडूच्या रानाथपुरम येथे १९ दहशतवादी असल्याचाही त्याने दावा केला आहे. या फोननंतर कर्नाटक पोलिसांनी सर्व संबंधीत राज्यांच्या पोलिसांना पत्र लिहून खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

दरम्यान, तामिळनाडूनच्या चेन्नई पोलिसांनाही एक फोन आला होता. यामध्ये रामेश्वरमधील प्रसिद्ध पंबन सी पुल उडवण्याची धमकी देण्यात आली होती. या फोन नंतर पोलिसांनी संबंधीत पुलावर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण केले होते. तसेच इतर महत्वाच्या ठिकाणांनाही त्यांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गोखलेनगर वाकडेवाडी भागातील वसाहतीतील जनतेला चांगल्या सुविधा मिळवून देणार: आम आदमी पार्टी

पुणे:गोखलेनगर, वाकडेवाडी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वसाहती असून त्यामध्ये ड्रेनेज...

अत्याधुनिक इंजिनिअरिंग कॉलेज,मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि आबा बागुलांच्या जाहीरनाम्यात पर्यावरण हमी

सर्वसमावेशक विकासाचेच धोरण:आबा बागुल नगरविकास विभागामार्फत भरघोस निधी होणार उपलब्ध ...

इंदिरा आणि अविनाश बागवे ,रफीक शेख व दिलशाद शेख यांनी साधला आम जनतेशी संवाद

पुणे — सर्वसामान्य जनतेचे हित जपणे हाच काँग्रेस चा...

औंध – बोपोडी परिसराच्या विकासाला गती देणार – सनी विनायक निम्हण

पुणे: महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांचे जगणे सुलभ आणि वेगवान करणाऱ्या...