Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महसुली तुट अनुदानापोटी देशातील 14 राज्यांना 7,183 कोटी 42 लाख रुपये जारी

Date:

नवी दिल्‍ली, 3 ऑगस्‍ट 2022

केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अखत्यारीतील व्यय विभागाने, राज्यांना महसुली तूट भरून काढण्यासाठीच्या  पीडीआरडी अर्थात पोस्ट डिव्होल्युशन रेव्हन्यू डेफिसिट अनुदानाचा पाचवा  मासिक हप्ता म्हणून, 7,183 कोटी 42 लाख रुपयांचा निधी वितरीत केला. पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसींनुसार हे अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

पंधराव्या वित्त आयोगाने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 14 राज्यांना पोस्ट डिव्होल्युशन रेव्हन्यू डेफिसिट अनुदानापोटी एकूण 86,201 कोटी रुपये देण्याची शिफारस केली आहे. शिफारस केलेले अनुदान व्यय विभागातर्फे राज्यांना 12 समान मासिक हप्त्यात जारी करण्यात येते. ऑगस्ट 2022 मध्ये देण्यात आलेल्या पाचव्या मासिक हप्त्यासह राज्यांना 2022-23 मध्ये वितरीत झालेल्या अनुदानाची रक्कम आता 35,917 कोटी 8 लाख रुपये झाली आहे. 

राज्य घटनेच्या कलम 275 अंतर्गत केंद्र सरकारतर्फे राज्यांना पोस्ट डिव्होल्युशन महसुली तूट अनुदान देण्यात येते. महसुली खात्यांमध्ये राज्यांना सोसावी लागणारी पोस्ट डिव्होल्युशन तफावत भरून काढण्यासाठी लागोपाठच्या वित्त आयोगाच्या शिफारसींनुसार राज्यांना ही अनुदाने वितरीत करण्यात येतात.

राज्याचा  महसूल आणि व्यय  यांच्यातील फरकांच्या आधारे  वर्ष 2020-21 ते 2025-26 या कालावधीत किती डिव्होल्युशन असेल याचे मूल्यांकन केल्यानंतर पंधराव्या वित्त आयोगाने या कालावधीत हे अनुदान मिळण्याबाबत राज्यांची पात्रता आणि अनुदानाची रक्कम निश्चित केली आहे.

पंधराव्या वित्त आयोगाने, वर्ष 2022-23 मध्ये  आंध्र प्रदेश, आसाम,  हिमाचल प्रदेश,   केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, पंजाब, राजस्थान, सिक्कीम,  त्रिपुरा, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांना पोस्ट डिव्होल्युशन महसुली तूट अनुदान मिळण्यासाठी शिफारस केली आहे.

राज्यांना वर्ष 2022-23 साठी पोस्ट डिव्होल्युशन महसुली तूट अनुदान मिळण्यासाठी शिफारस करण्यात आलेला निधी तसेच या अनुदानाचा पाचवा हप्ता  म्हणून आतापर्यंत वितरीत करण्यात आलेला  राज्यनिहाय निधी : 

(रक्कम कोटी रुपयांमध्ये)

S. No.Name of StatePDRDG recommended by FC-XV for the year 2022-23.5th instalment released for the month of August, 2022.Total PDRDG released to States during 2022-23.
1Andhra Pradesh10,549879.084395.42
2Assam4,890407.502037.50
3Himachal Pradesh9,377781.423907.08
4Kerala13,1741097.835489.17
5Manipur2,310192.50962.50
6Meghalaya1,03386.08430.42
7Mizoram1,615134.58672.92
8Nagaland4,530377.501887.50
9Punjab8,274689.503447.50
10Rajasthan4,862405.172025.83
11Sikkim44036.67183.33
12Tripura4,423368.581842.92
13Uttarakhand7,137594.752973.75
14West Bengal13,5871132.255661.25
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष...