अमेरिकेत कोरोनामुळे 40 भारतीयांचा मृत्यू, 1,500 हून अधिक संक्रमित

Date:

वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोनाने हाहाकार घातला आहे. कोरोनामुळे एकाज दिवसात 2000 हून अधिक मृत्यूची नोंद होणारा अमेरिका हा जगातील पहिला देश ठरला आहे. यातच आता 40 हून अधिक भारतीय-अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला असून तब्बल 1500 हून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

अमेरिकत कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकांमध्ये 17 जण केरळमधील, 10 जण गुजरातमधील, 4 जण पंजाबमधील, 2 जण आंध्र प्रदेशातील तर 1जण ओडिशातील आहे. यात अधिकांश लोक 60 वर्षांहून अधिक वय असलेले आहेत. एक एक जण 21 वर्षांचा आहे.

विविध समुदायांतील नेत्यांनी जारी केलेल्या एका यादीनुसार, न्यूजर्सी राज्यात 12 हून अधिक भारतीय-अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला. तर याच प्रकारे न्यूयॉर्कमध्ये 15, पेन्सिल्वेनिया आणि फ्लोरिडातही 4, तर टेक्सास आणि कॅलिफोर्नियामध्ये प्रत्येकी एका भारतीय-अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाल्याचे समजते.

न्यू यॉर्कमध्ये 1,000 हून अधिक भारतीय-अमेरिकन संक्रमित –
याच बोरबर न्यूजर्सीमध्ये 400 हून अधिक आणि न्यू यॉर्कमध्ये 1,000 हून अधिक भारतीय-अमेरिकन नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. न्यू यॉर्क शहरातील अनेक भारतीय-अमेरिकन टॅक्सी ड्रायव्हरचे कोरोना रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. मृतांमध्ये, सुन्नोवा अॅनालिटिकल इंकचे सीईओ हनमंथ राव मारेपल्ली यांचाही समावश आहे. त्यांचा मृत्यू न्यूजर्सीतील एडिसनमध्ये झाला आहे. ते तेथे पत्नी आणि दोन मुलींसह राहत होते.

जगात कोरोना बाधितांची संख्या 16 लाख 50 हजारहून अधिक –
आतापर्यंत भारतासह संपूर्ण जगात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 16 लाख 50 हजारहून अधिक आहे. तर एक लाखाहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 लाख 68 हजार 668 लोक या आजारापासून बरे झाले आहेत. संपूर्ण जगाच्या तुलनेत इटलीमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत 18 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापौर मंजुषा नागपुरे यांनी कळस आणि बोपोडी येथे दोन्ही पालख्यांचे केले औक्षण; वारकऱ्यांसमवेत फुगडीचा आनंद

ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम...

वारकऱ्यांसाठी महावितरणची मोबाईल चार्जिंग सुविधा

योजनांच्या जनजागृतीसाठी केला चित्ररथ पुणे, दि. ९ जुलै, २०२६- आषाढी...

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना’ ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधार

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत १ ते ३१ जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज...