पुणे- कामावर जाते सांगून गेलेली ३५ वर्षे वयाची विवाहित तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार या तरुणीच्या आईने पोलिसात दिली आहे . बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव सविता महादेव काकडे (रा. जळके वस्ती,शास्त्री नगर ,कोथरूड )असे असून ती आपल्या घरातून १० डिसेम्बर २०२० रोजी सकाळी ८ वाजता कामावर जाते म्हणून गेली आणि बेपत्ता झाली अशी तक्रार तिची आई सौ केसरबाई श्रावण बुचटे (वय ६५ , रा. दत्त मंदिराजवळ , किष्किंधा नगर ,कोथरूड, पुणे ३८) यांनी दिली आहे.
सोबत कोथरूड पोलिसांनी पाठविलेल्या पत्राची प्रत जोडली आहे.