पुणे- अठ्ठावीस वर्षे वयाचा तरुण बेपत्ता झाल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी याबाबतची माहिती जनसंपर्क कार्यालयामार्फत माध्यमांना पाठविली आहे . बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव हर्षद मनोहर गुजर असून (रा. राजेंद्र नगर ,दत्तवाडी ,पुणे) असे आहे. त्याच्या मानेवर डाव्या बाजूस HARSH असे आणि डाव्या हाताच्या दंडावर HG असा टॅॅटू काढलेला आहे. याप्रकरणी अक्षय बाळासाहेब गोडांबे (वय २५,रा. घोटावडे, ता. मुळशी ,जी. पुणे )यांनी फिर्याद नोंदविली आहे. हर्षद हा फिर्यादीचा मेव्हणा असून तो १० डिसेम्बर रोजी रात्री ११ वाजता एफ सी कॉलेज नंबर १ गेट समोरील पाटील बंगला ,डेक्कन येथून निघून गेला आहे. सोबत डेक्कन पोलिसांनी प्रसिद्धीसाठी पाठविलेली प्रत जोडली आहे.