Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नवीन वीजजोडणीमधील विलंब दूर करण्याची प्रक्रिया सुरु

Date:

22465796.cms

पुणे: नवीन वीजजोडणीसाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही विलंब होत असल्याच्या तक्रारी निकाली काढण्याची प्रक्रिया थेट परिमंडलस्तरावरून सुरु झालेली आहे. यात 5 जणांकडे नवीन वीजजोडणी कार्यान्वित झाली आहे.

ज्या ग्राहकांनी महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक नवीन वीजजोडणीसाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली आहे. फर्म कोटेशनची रक्कम भरली आहे, अशा ग्राहकांना वीजजोडणी देण्यास विलंब होत असल्यास त्याची थेट परिमंडलस्तरावर दखल घेऊन कार्यवाही करण्यात येत आहे. पुणे परिमंडल कार्यक्षेत्रातील ग्राहकांना कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व वेळेत 7875767123, 7875767058 या मोबाईल क्रमांकावर वीजजोडणीच्या विलंबाबाबत माहिती देता येईल. प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्वरीत वीजजोडणी देण्याबाबत थेट परिमंडलस्तरावरून कार्यवाही करण्यात येणार आहे तसेच संबंधीत ग्राहकांना त्याबाबत कळविण्यात येणार आहे.

यात गेल्या महिन्याभरात सुमारे 175 कॉल्स प्राप्त झाले. त्यातील 14 तक्रारींमध्ये कोटेशनची रक्कम भरल्यानंतर वीजजोडणी देण्यास विलंब झाल्याचे नमूद होते. यात सिंगल फेज व तीन फेजच्या प्रत्येकी 7 तक्रारींचा समावेश आहे. सिंगल फेजच्या 7 पैकी 5 तक्रारींचे निवारण झाले असून उर्वरित दोन तक्रारींनुसार वीजजोडणी देण्याची कार्यवाही सुरु आहे. तर तीन फेजच्या 7 वीजजोडण्या कृषीपंपाच्या असून त्या प्रतीक्षायादीनुसार देण्यात येणार आहेत. उर्वरित कॉल्स हे विविध माहिती विचारण्यासाठी होते.

नवीन वीजजोडणीसाठी सर्व कागदपत्रांची पुर्तता व कोटेशनची रक्कम भरल्यानंतरही वीजजोडणीस विलंब होत असल्यास त्याची माहिती देण्यासाठी 7875767123, 7875767058 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कम ऑन किल मी.. आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणाले …. मरे हुए क्या मारना,मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे...

वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद:उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भावना

वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ 'सिंबायोसिस' व सौ. शीला राज...

पुण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस...