ऑगस्ट २०१५ मध्ये ब्राझील येथे ४३व्या जागतिक कौशल्य स्पर्धेत ‘विटांचे बांधकाम’ (ब्रिक लेईंग) या गटात वीट बांधकाम तज्ञ म्हणून केलेल्या यशस्वी कामगिरीसाठी कुशलचे अध्यक्ष श्री. जे. पी. श्रॉफ यांना केंद्रीय नागरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू, आणि कौशल्य विकासमंत्री राजीव प्रताप रुडी यांच्या हस्ते मुंबई येथे स्वामी विवेकानंद यांच्या १५३व्या जयंतीनिमित्त आयोजित कौशल्य विकास परिषदेत नुकतेच सन्मानित करण्यात आले.