‘ गुरु’ चे विशेष गाणे पुण्यात प्रदर्शित
पुणे-‘गुरू’ सिनेमातील मँगोडॉली हे आणखी एक विशेष गाणं नुकतंच पुण्यात प्रदर्शित करण्यात आलं.विशेष म्हणजे पुण्याच्या आमदार दीप्ती चवधरी यावेळी कुटुंबियांसह उपस्थित होत्या आणि त्यांनी गुरु ला भरभरून शुभेछ्या हि दिल्या
गुरू काऊन डाउन सुरु… वाटेला नाय जायचं आपला विषय खोल आहे… अशी तुफान डायलॉग बाजी करणारा गुरु हा सिनेमा २२ जानेवारी रोजी प्रदर्शित होतोय. इरॉस इंटरनॅशनल, बॅगपायपर सोडा आणि ड्रीमिंग ट्वेंटी फोर सेव्हनची निर्मिती असेलला हा सिनेमा येत्या वर्षातील धमाकेदार फिल्म असेल. एंटरटेनमेंटचं कमप्लीट पॅकेज असलेला डॅशिंग गुरु प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करेल यात शंका नाही. एका मागोमाग एक सुपरहिट सिनेमे देणारा आणि महाराष्ट्राचा लाडका सुपरहिरो अंकुश चौधरी या सिनेमातून आपल्याला झकास लुकमध्ये दिसणार आहे त्याचा हाच बेस्ट लूक आणि त्याची सिनेमातील भूमिका प्रेक्षक आणखी पसंत करतील. नुकतंच सिनेमाचं टायटल साँग आणि ‘फिल्मी फिल्मी’… हे रोमॅंटिक गाणं प्रेक्षकांच् या भेटीला आलं आहेत. सिनेमातील या दोन गाण्याची जादू प्रेक्षकांच्या डोक्यावरून उतरत नाही तोच ‘गुरू’ सिनेमातील मँगोडॉली हे आणखी एक विशेष गाणं नुकतंच पुण्यात प्रदर्शित करण्यात आलं. उर्मिला कानेटकर हिच्यावर चित्रित झालेलं हे गाणं तिच्या अभिनयाची वेगळीच झलक दाखवणारं आहे. पुण्यातील ई स्क्वेअर हॉटेलमध्ये अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेत्री उर्मिला कानेटकर, दिग्दर्शक संजय जाधव यांच्या उपस्थितीत लाँच झालं. या गाण्याचं संगीत दिग्दर्शन पंकज पडघन यांनी केलं असून सायली पंकज आणि सागर फडके या जोडीने मँगोडॉली गाण्याला स्वरसाज दिला आहे. गीतकर कौस्तुभ पानत यांनी लिहिलेल्या गाण्यावर उमेश जाधव यांनी या गाण्याची सुंदर कोरिओग्राफी केली आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळे हे गाणं खूपच खुलून दिसतंय. या सिनेमातील अगदी धडाकेबाज डायलॉग आशिष पाथरे यांनी लिहिले आहेत