‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचा १००० भागांचा यशस्वी प्रवास

Date:

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. आता हि मालिका एका नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेवर, यातील पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. रांगडा ‘राणादा’ आणि लाघवी पाठक बाई तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले. या मालिकेच्या कथानकाने नुकतीच ५ वर्षांची आघाडी घेतली. यानंतर देखील प्रेक्षकांनी मालिकेला भरगोस प्रतिसाद दिला.

नुकतंच या मालिकेने १००० भागांचा यशस्वी टप्पा पार पडला. प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा यामुळे तुझ्यात जीव रंगला या मालिकेने १००० भागांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला. याचं सेलिब्रेशन सेटवर पार्टी करून, केक कापून न करता एका वेगळ्या पद्धतीने केलं. हा आनंदाचा क्षण सेटवर पूजा करून साजरा करण्यात आला. याबद्दल बोलताना पाठकबाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर म्हणाली, “प्रेक्षकांच्या अखंड प्रेमामुळे तुझ्यात जीव रंगला या मालिकेने १००० भाग पूर्ण केले. यामध्ये या वास्तूचा देखील खूप मोठा हात आहे. या वास्तूने आम्हाला साडे तीन वर्ष साथ दिली. त्यामुळे या वास्तूचे आभार मानून नवीन एपिसोडची सुरुवात करण्यासाठी आम्ही पूजेचा घाट घातला. रसिक प्रेक्षकांनी आमच्यावर केलेल्या प्रेमासाठी आणि त्यांनी इथंवर दिलेल्या साथीसाठी मी त्यांचे आभार मानते.”

राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी म्हणाला, “दरवेळी केक कापून किंवा पार्टी करून हा आनंद साजरा करण्यात येतो पण यावेळी आमच्या संपूर्ण टीमने असा निर्णय घेतला कि जिथे आपण शूट करतो तिथे सकारात्मक वातावरण बनवण्यासाठी आपण एक छानशी पूजा आणि होम करून हा आनंद साजरा करूया. म्हणून ही पूजा आम्ही सेटवर केली. १००० भाग पूर्ण केल्याचं सगळं श्रेय मी प्रेक्षकांना देतो, ज्यांनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे म्हाळुंगे स्विचिंग उपकेंद्राला मिळणारा वीजपुरवठा विस्कळीत; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

पुणे : एका अज्ञात वाहनाने मंगळवारी (दि. २१) दुपारी ५ वाजेच्या सुमारास धडक दिल्याने ४०० केव्ही कुरुळी अतिउच्च दाब उपकेंद्रातून निघणाऱ्या २२ केव्ही म्हाळुंगे स्विचिंग इनकमर आणि २२ केव्ही एमआयडीसी डबल सर्किट फीडरला आज (दि. २१) फटका बसला आहे. वाहनाच्या...

ख्रिश्चन समाजातील उद्योजक व व्यावसायिकांच्या संस्थेची पुण्यात होतेय स्थापना

पुणे- शहरातील अल्पसंख्यांक व ख्रिश्चन समाजातील उद्योजक व व्यापारी...

अध्यक्षपदाची गाडी नाकारून बचतीचा निधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा बाप्पू मानकर यांचा निर्णय

विश्रामबाग वाडा प्रभाग समिती अध्यक्षपदी राघवेंद्र (बाप्पू) मानकर बिनविरोध.. पुणे:...

रेल्वेकडून उन्हाळी सुटीच्या तीन महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण देशात 18262 उन्हाळी विशेष रेल्वे फेऱ्या

गर्दीच्या हंगामात प्रवाशांना दिलासा देण्यासाठी 11294 फेऱ्यांची आधीच घोषणामध्य...