१५३ विद्यार्थ्यांना मिळाले ‘ऑफर लेटर’ तसेच २५९ विद्यार्थी शॉर्टलिस्टमध्ये
पुणे, : सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या बावधन कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘जॉब फ़ेअर’चे आयोजन करण्यात आले. सूर्यदत्ता व्यतिरिक्त पुण्यातील व महाराष्ट्रातील इतर शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनादेखील जॉब फ़ेअरमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यामध्ये एकूण १७५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच २५९ विद्यार्थी शॉर्टलिस्ट करण्यात आले व त्यातील १५३ विद्यार्थ्यांना लगेच ऑफर लेटरही देण्यात आले.
” विद्यार्थ्यांचा तसेच काही कंपन्यांचा ‘जॉब फ़ेअर’ ला भरगोस प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांना त्यांचे भविष्य घडविण्यासाठी जास्तीतजास्त नोकरीच्या संधी मिळवून देण्याचा आमचा मानस होता. तसेच आमच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनाही बाहेरील विद्यार्थ्यांशी स्पर्धा असल्याची मानसिकता तयार झाली व हीच गोष्ट त्यांना मोठी शिकवण देणारी ठरली असावी. अजूनही काही कंपन्या काही विद्यर्थ्यांना शॉर्टलिस्ट करीत आहेत. ” असे सूर्यदत्ता संस्थेचे संस्थापक संचालक डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले.
टेक महिंद्रा, रिलायंन्स, एक्सिस सिक्युरीटी , डॉ. रेड्डी फाउंडेशन, मोफाई रँडस्टॅड, थायरोकेअर टेक्नोलोजी , सिंटेल टेलीकॉम तसेच अशा एकूण ३२ कंपन्यांपेक्षा जास्त कंपन्यांनी या कॅम्पस सिलेक्शन मध्ये आपला सहभाग नोंदविला. बीबीए, बीएससी, बी. कॉम, बीसीए अशा पदवीधर व एमबीए, एमसीए. एम.कॉम, एमएससी अशा पदव्युत्तर पदवीधर तसेच डीप्लोमा व पीजी डीप्लोमा आणि काही बारावी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना ‘जॉब फ़ेअर’द्वारे नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या गेल्या.
‘जॉब फ़ेअर’चे उद्घाटन सूर्यदत्ता संस्थेचे संस्थापक संचालक डॉ. संजय चोरडिया, सुषमा चोरडिया, प्लेसमेंट समन्वयक नेहा इनामदार, ‘जॉब फ़ेअर’ चे समन्वयक रवींद्र कंग्राळकर व बावधनचे माजी सरपंच किरण दगडे यांनी केले.