‘स्माईल’ संस्थेचा वर्धापनदिन साजरा
पुणे :
‘स्माईल’(सावित्री मार्केटिंग इन्स्टिट्यूट फॉर लेडिज एम्पॉवरमेंट) या स्वयंसेवी संस्थेचा पंधरावा वर्धापनदिन जागतिक महिलादिनी साजरा करण्यात आला. यावेळी मनाली भिलारे, पद्मा कांबळे, संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी यांच्या हस्ते केक कापण्यात आला.
खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी ‘स्माईल’संस्थेची स्थापना जागतिक महिलादिनी 8 मार्च 2000 रोजी करण्यात आली होती.
महिला सबलीकरण, सक्षमीकरण, स्वयं रोजगार निर्मिती, विविध प्रकारच्या रोजगार निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा याविषयी संस्थेच्या वतीने महिलांना मार्गदर्शन करण्यात येते.
या पंधरा वर्षामध्ये स्माईल संस्था महिलांना प्रेरणा देणारे तसचे विविध उपक्रमांद्वारे महिलांना उत्पन्न मिळवून देणारी विश्वासार्ह संस्था ठरली आहे. तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवीन उपक्रम चालवून भविष्यात महिलांना आधुनिक सेवा देण्याचाही संस्था प्रयत्न करीत आहे.