सिनेसृष्टीतील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्ती या संस्थेत विद्यार्थी घडवतील . यामध्ये मनी रत्नम , रेसूल पुकुट्टी , शंकर महादेवन , अंजुम रजाब अ ली, विनोद प्रधान , उज्वल निरगुडकर , राजीव मंसाद, आदींचा समावेश असणार आहे . दिग्दर्शन , छायाचित्रण , ध्वनी मुद्रण , व संकलन या विषाचा ३ वर्षांचा तर पटकथा लेखन आणि कला दिग्दर्शन या विषयाचा २ वर्षांचा तर दूरचित्रवाणी निर्मितीमध्ये एक वर्षाचा अभ्यासक्रम ठेवण्यात आला आहे
यासंदर्भात श्री कराड म्हणाले ,’राजकपूर यांनी राजबाग मध्ये अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिण्यापासून ते नियोजन आणि चित्रीकरण आदी बाबी केल्या . राजकपूर यांचे पिताश्री पृथ्वीराज कपूर आणि मातोश्री रामसारणी देवी यांची हि समाधी येथे आहे . पुण्याला चित्रपट निर्मितीची समृध्द परंपरा आहे . राजबागेत राजकपूर मेमोरीयल द गोल्डन ईरा ऑफ सिनेमा ‘ उभारण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर येथे सिने अभ्यासाचे धडे देवून कलावंत घडविणे हि राजकपूर यांना आदरांजलीच ठरणार आहे