सरकारने अल्पसंख्यांक समाजासाठी आखलेल्या सर्व योजना अंमलबजावणीसाठी आपण लक्ष केंद्रित देणार-गिरीश बापट

Date:

पुणे-समाजाची फसवणूक आता चालणार नाही . आता कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळाली आहे . आपण सरवणी हातात हात घालून काम करणार आहोत . मुस्लिम अल्पसंख्यांक व पुणेकरांच्यावतीने महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला . पुणे कॅम्प मधील आझम कॅम्पसमधील असेम्ली हॉलमध्ये झालेल्या नागरी सत्कार सोहळ्यास अप्पर पोलिस आयुक्त कैसर खालिद , हाजी इसहाक चाविवले , बासित शेख ,नगरसेवक अशोक येनपुरे , इक्राम खान ,मौलाना डॉ. शबि अहसन काझ्मी, अली इनामदार , लतिफ़ मकदूम , पोलिस निरीषक फिरोज बागवान , अक्रम मदारी आदी मान्यवर उपस्थित होते .

   यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले कि , सर्व धर्माला बरोबर घेऊन आपण काम करतो म्हणूनच आत्मविश्वासाने काम करतो दोन समाज एकत्र आले पाहिजे , त्यातून कठीण परिस्थिती दूर होईन . मागचा इतिहास विसरून पुढील आपले भवितव्य ठरवायचे आहे . सर्वजण वातावरण बदलून एकमेकांचा विश्वास निर्माण करण्याचे काम करत आहे . कोणत्या समाजावर मी टीका करणार नाही , शिक्षणावर मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाने लक्ष केंद्रित केले पाहिजे . त्यामुळे शिक्षणातून माणूस भावनिक होत नाही . मुस्लिम समाजाने चांगले व्यवसाय करण्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक आहे . समाजाने शिक्षणाबरोबर पुढे आले पाहिजे .  सरकारने अल्पसंख्यांक समाजासाठी खूप योजना आखलेल्या आहेत . या सर्व योजना अंमलबजावणीसाठी आपण लक्ष देणार आहोत

    यावेळी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष मोहम्मद हुसेन खान यांनी सांगितले कि , आपण आपल्या पदाचा  अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी करणार आहोत , समाजाने देखील काम करताना कोठे अडचण भासल्यास माझ्याशी संपर्क साधला पाहिजे . जास्तीत जास्त कामे या आयोगाकडून करण्याचा माझा विश्वास आहे . अल्पसंख्यांक महाविद्यालयाच्या ५० टक्के सवलती आहेत त्या मिळत नाहीत . या सवलती मिळण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे . महाराष्ट्रातील पहिले अल्पसंख्यांक महाविद्यालय राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री एकनाथ खडसे यांच्या सहकार्याने जळगाव येथे सुरु करणार आहे .

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत बासित शेख यांनी केले तर सूत्रसंचालन इकबाल अन्सारी यांनी केले तर आभार हाजी इसहाक चाविवले यांनी मानले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात रंगणार सहावा सुपरहिट ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’!

(शरद लोणकर) मराठी चित्रपटसृष्टीतील वैविध्यपूर्ण कथा, नव्या विचारांची मांडणी आणि...

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती प्रक्रियेवरून केंद्र सरकारवर काँग्रेसचा निशाणा

सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीचे काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांच्याकडून स्वागत पुणे...

… मोदी, खुर्ची खाली करा’

पेट्रोल, डिझेलचे दर कमी करा-स्वाती शिंदे, अध्यक्ष पुणे शहर...

SIR अभियानासाठी काँग्रेस सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांची राज्य समन्वयकपदी नियुक्ती.

मुंबई, दि. १५ मे २०२६ निवडणूक आयोगाने राज्यात जाहीर केलेल्या...