श्री बालाजी कॅम्प ग्रुपच्यावतीने विवध धार्मिक कार्यक्रमानी कल्याणोत्सव ( शुभविवाह ) विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला . यामध्ये गणेशपूजन , पुण्याहवचन , कलश स्थापन , मूर्ती हवन , पूर्णा अहुती , प्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाले . श्री. भगवान बालाजी लक्ष्मीमाता व पदमावती यांचा लग्नसोहळ्यानिमित बांगडी व मेहंदीचा कार्यक्रम झाला . यावेळी महिलांची उपस्थिती होती . दुसऱ्यादिवशी सुप्रभात सेवा , मूर्ती हवन , महापुर्णा अहुती ,महाअभिषेक , मुलविग्रह कलाशाभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम झाले . जगदपिता श्री. वेंकटेश्वरा व जगदमाता लक्ष्मीमाता व पदमावती यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली .हि मिरवणूक सोलापूर बाजार , कन्याशाळा , सोलापूर बाजार पोलिस चौकी , जैन मंदिर , पुणे कॅंटोन्मेंट कर्मचारी वसाहत, श्री. बालाजी मंदिर या मार्गे काढण्यात आली . या मिरवणुकीत बालाजी भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
सांयकाळी श्री. भगवान बालाजी भक्ती गीतांचा कार्यक्रम झाला . हि भक्ती गीते प्रविणकुमार कन्नन गुरुजी यांनी गायली . संध्याकाळी श्री. भगवान बालाजी आरती झाली त्यानंतर सर्व बालाजी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .
यावेळी पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे नगरसेवक विवेक यादव , दिलीप गिरमकर , अतुल गायकवाड नगरसेविका रुपाली बिडकर , बंडूअण्णा आंदेकर व बालाजी भक्त सहभागी झाले होते . मोठ्यासंख्येने बालाजी भक्त सहभागी झाले होते .