लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
पुणे :
‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’च्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती शहर पक्ष कार्यालय, टिळक रोड येथे साजरी करण्यात आली. पुणे शहर ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’च्या वतीने आमदार जयदेव गायकवाड यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी पंडीत कांबळे, अर्जून गोजे, अॅड.औदुंबर खुने-पाटील यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला नामदेव पवार, राम ससाणे, संदीप गाडे, राकेश भोसले, राजश्री मुदलीयार, सुरेश पवार, शंकर शिंदे, आनंद सवाणे, हरीश ओव्हाळ, शिल्पा भोसले, शाम डावरे, प्रशांत गांधी, योगेश वराडे, अविनाश वेल्हाळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शामलाल मिसाळ यांनी केले तर संजय गाडे यांनी आभार मानले.
लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
‘पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’च्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी शहर पक्ष कार्यालय, टिळक रोड येथे साजरी करण्यात आली. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘सामाजिक न्याय विभागा’चे अध्यक्ष आनंद रिठे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
यावेळी विनायक चाचर, संजय दामोदरे, पंडीत कांबळे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला हरीश ओव्हाळ, शिल्पा भोसले, शाम डावरे, प्रशांत गांधी, योगेश वराडे, अविनाश वेल्हाळ, शाम ढावरे, नामदेव पवार, राम ससाणे, संदीप गाडे, राकेश भोसले, राजश्री मुदलीयार, सुरेश पवार, शंकर शिंदे, आनंद सवाणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शांतीलाल मिसाळ यांनी केले तर संजय गाडे यांनी आभार मानले.