‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा’च्या सांस्कृतिक विभागाच्या दिनदर्शिकेचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे :
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’च्या ‘साहित्य, कला व सांस्कृतिक विभागा’च्या वतीने नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदीर येथे सोमवारी झाले.यावेळी ‘साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे राज्य प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, चैतन्य ऊर्फ सनी अशोक मानकर, प्रदीप गारटकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’च्या ‘साहित्य, कला व सांस्कृतिक विभागा’च्या वतीने प्रभाग क्रमांक 35 (कर्वेनगर) येथील तीन हजार नागरिकांना 2016 च्या दिनदर्शिक‘ा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’च्या ‘साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे पुणे शहराध्यक्ष चैतन्य ऊर्फ सनी अशोक मानकर यांच्या वतीने देण्यात येणार आहेत
.
या दिनदर्शिकेमध्ये प्रभाग क्रमांक 35 मध्ये 2011 ते 2015 या कालावधीत केलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला आहे.