मिठाईत भेसळ-व्यापार्‍याला तीन वर्षे कैदेची शिक्षा

Date:

पुणे -बालुशाही या मिठाईत भेसळ केल्याप्रकरणी येथील विलास माणिकचंद वैष्णव या व्यापार्‍याला तीन वर्षे साधी कैद व पाच हजार रुपयांच्या दंड अशी शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रेवती कंटे यांनी सुनावली आहे. अन्नपदार्थांमध्ये भेसळ केल्याप्रकरणी व्यापार्‍याला ऐन दिवाळीच्या तोंडावर शिक्षा झाल्याने बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. सणासुदीच्या काळात भेसळयुक्त पदार्थांवर पालिकेच्या आरोग्य विभागाची करडी नजर राहणार असून अनेक व्यापार्‍यांचे यामुळे धाबे दणाणले आहे.
दरम्यान, या शिक्षेच्या पार्श्‍वभूमीवर दिवाळी सणाच्या कालावधीत व्यापारीवर्गाने शुद्ध व भेसळमुक्त मिठाई व अन्नपदार्थ विक्री करण्याचे आवाहन पालिकेचे आरोग्यप्रमुख एस. टी. परदेशी यांनी केले आहे. तसेच दिवाळीच्या काळात नागरिकांनी मिठाई खरेदी करताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही आवाहन त्यांनी म्हटले आहे.
या खटल्याची अधिक माहिती देताना पालिकेच्या विधी सल्लागार अँड़ मंजूषा इधाटे म्हणाल्या, २ जुलै २00८ रोजी पुणे महानगरपालिकेचे अन्ननिरीक्षक अजित भुजबळ यांनी कसबा पेठ येथील वैष्णव यांच्या वैष्णव स्वीट्स या मिठाईच्या दुकानातून बालुशाहीचा नमुना अन्न भेसळप्रतिबंधक कायद्यांतर्गत विश्लेषणाकरिता घेतला होता. तपासणीअंती या पदार्थामध्ये अँल्युमिनियम फॉइल असल्याचा अहवाल पब्लिक अँनालिस्ट, राज्य आरोग्य प्रयोगशाळा यांनी दिला होता. त्यानुसार भुजबळ यांनी संपूर्ण तपास करून विलास वैष्णव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने वैष्णव यांना तीन वर्षे साधी कैद व पाच हजार रुपयांचा दंड सुनावला. मिठाईसारख्या खाद्यपदार्थावर शुद्ध चांदीचा वर्ख वापरण्यास कायद्याने परवानगी आहे. परंतु आरोपीने शुद्ध चांदीचा वर्ख वापरण्याऐवजी अँल्युमिनियम फॉइलचा वापर केला आहे. अँल्युमिनियम हा पदार्थ मानवी आरोग्यास घातक आहे., असे न्यायाधीशांनी निकालात नमूद केले आहे. या खटल्यात पुणे महानगरपालिके तर्फे अँड़ सुहास चौधरी व अँड़ प्रशांत यादव यांनी बाजू मांडली व प्रमुख विधी सल्लागार अँड़ इधाटे यांनी मार्गदर्शन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भूमी ग्रीन’च्या ५७७ कोटींच्या कचरा प्रकल्पाला अखेर मंजुरी

विरोधकांचे आक्षेप फेटाळले; तिन्ही उपसूचना १०९ विरुद्ध ३६ मतांनी...

दुचाकीचे ३, चारचाकीचे १४; वसुली मात्र १०० ते २०० रुपये! पार्किंग दरावरून महापालिकेत रणकंदन

महात्मा फुले मंडईतील वाहनतळाच्या प्रस्तावावर नगरसेवक आक्रमक; ठेकेदारांविरोधातील तक्रारींची...

निधी वाटपाच्या वैधानिकतेवर प्रश्नचिन्ह; अमोल बालवडकर आक्रमक

‘स’ यादीतील हजारो कोटींचे वाटप कोणत्या कायद्यानुसार? सर्वसाधारण सभेत...

साडेचार हजार कोटींच्या ठेवी असताना पुणे महापालिका घेणार १,१६७ कोटींचे कर्ज…

‘अर्बन चॅलेंज फंड’अंतर्गत पाणीपुरवठा, जलनिस्सारण आणि मलनिस्सारणाच्या प्रकल्पांना गती;...