भारती विद्यापीठाच्या 4 इन्स्टिट्यूटस् चा पतंगराव कदम यांच्या हस्ते सत्कार
पुणे:
भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आय.एम.ई.डी.)ला ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅकिंग फ्रेमवर्क’नुसार (एनआयआरएफ) मानांकनात पुण्यात प्रथम क्रमांक तर राज्यात 3 रा क्रमांक मिळाला आहे.
भारती विद्यापीठाच्या ’ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’( पुण्यात प्रथम क्रमांक, राज्यात 3 रा क्रमांक ,देशात 46) ),पूना कॉलेज ऑफ फार्मसी’,( देशात चौथे,राज्यात प्रथम क्रमांक ),कॉलेज ऑफ इंजिनियरिंग(खासगी संस्था श्रेणीत राज्यात प्रथम क्रमांक ,देशात 61 ) ,कॉलेज ऑफ फार्मसी -कोल्हापूर (देशात 25 )या 4 इन्स्टिट्यूटचा या मानांकनात समावेश आहे.
डॉ.सचिन वेर्णेकर(इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ ,के.आर.महाडिक (इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’),ए.आर.भालेराव (कॉलेज ऑफ इंजिनियरिंग )या इन्स्टिट्यूट संचालकांचा भारती विद्यापीठ संस्थापक आणि कुलपती डॉ.पतंगराव कदम ,कुलगुरू डॉ.शिवाजीराव कदम यांनी पुण्यात सत्कार केला.
भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, सचिव डॉ,विश्वजीत कदम यांनी संस्थेच्या टीमचे अभिनंदन केले.
‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅकिंग फ्रेमवर्क’च्या वतीने ’इंडिया रेन्किंग 2016’ या नावाने हे सर्वेक्षण झाले होते आणि केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांनी या मानांकनांची घोषणा नुकतीच केली.
देशभरातील उच्चशिक्षण देणार्या संस्थांची राष्ट्रीय पातळीवरील मानांकने निश्चित करण्यासाठी केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एनआयआरएफची आखणी केली आहे.त्याकरीता योग्य आणि आवश्यक माहिती सादर करण्याचे आवाहन मंत्रालयाने देशातील उच्च शिक्षण देणारया संस्थांना केले होते. या माहितीच्या आधारे ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.
या यशाबद्दल बोलताना व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर म्हणाले,‘ कुलपती डॉ.पतंगराव कदम ,कुलगूरू डॉ. शिवाजीराव कदम,सचिव डॉ,विश्वजीत कदम यांचे मार्गदर्शन आणि प्राध्यापक,विद्यार्थी,इंडस्ट् री ,समाज या घटकांच्या सहकार्याने सर्व संस्था देशात नाव लौकिक करू शकली आहे.संपुर्ण टीममुळे हे यश मिळाले आहे.’