मुंबईः लाखो शौकिनांचे आकर्षण ठरलेली पण पोर्न स्टारची इमेज आडवी येत असल्याने सनी लिओन आता वारंवार अडचणीत सापडू लागली आहे . माझा भूतकाळ उगाळू नका असे सांगूनही तिचा भूतकाळ दाखवून तिला पद्धतशीरपणे बाजूला ठेवण्याचे प्रयत्न होत असल्याचा संशय आता निर्माण होतो आहे . काहीनी तिच्याबाबत केलेलि वक्तव्ये, इंटरनेट वरील छायाचित्रांचा आधार घेत तिच्यावर दाखल होत असलेले गुन्हे या सर्वामागे तिची ‘इमेज ‘ हेच कारण असल्याचे स्पष्ट दिसते आहे
पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओन आता घराच्या बाबतीत हि अडचणीत सापडली आहे. मुंबईत ज्या घरात ती वास्तव्याला होती, ते घर तिच्याकडून रिकामे करुन घेण्यात आले आहे. त्यामुळे तिच्यावर हॉटेमध्ये राहण्याची वेळ आली आहे.
बातम्यांनुसार, आपल्या अॅडल्ट स्टार इमेजमुळे सनीला मुंबईत स्वतःचे घर खरेदी करण्यात अनेक अडचणी येत आहेत. याच कारणामुळे ती एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहात होती. सनीची अडचण लक्षात घेऊन तिला ज्यांनी आपल्या फ्लॅट भाड्याने दिला होता.त्यांनीच मात्र आता सनीला घर रिकामे करण्यास सांगितले. याचे कारण म्हणजे, घरमालकाच्या मते सनी तिच्या फ्लॅटची नीट काळजी घेत नाहीये.असे देण्यात आले आहे आता सनी आपल्या पतीसोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये वास्तव्याला आहे. खरं तर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ठरल्यानंतरसुद्धा सनीला मुंबईथील रेसिडेंशिअल परिसरात भाड्याने किंवा खरेदी करण्यासाठी प्रॉपर्टी मिळत नाहीये. याचे कारण ठरले आहे तिची पोर्न स्टारची इमेज.
इन्टरनेट वर अश्लील, नग्न व विकृत छायाचित्रे आणि चलचित्रे टाकून तरुणाईला बिघडवण्याचे काम केल्याचा आरोप करीत अभिनेत्री सनी लिओनविरोधात विजापूर नाका पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.